कारागृहातील बॅरेकमध्ये झोपण्याच्या जागेवरून राडा; बंदीवानला बेदम मारहाण, दोन बंदीवानवर गुन्हा दाखल 

By दत्ता यादव | Published: November 27, 2022 07:21 PM2022-11-27T19:21:50+5:302022-11-27T19:22:38+5:30

कारागृहातील बॅरेकमध्ये झोपण्याच्या जागेवरून झालेल्या वादाप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

A case has been registered against both of them in connection with the dispute over sleeping space in the prison barracks  | कारागृहातील बॅरेकमध्ये झोपण्याच्या जागेवरून राडा; बंदीवानला बेदम मारहाण, दोन बंदीवानवर गुन्हा दाखल 

कारागृहातील बॅरेकमध्ये झोपण्याच्या जागेवरून राडा; बंदीवानला बेदम मारहाण, दोन बंदीवानवर गुन्हा दाखल 

Next

सातारा: जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बॅरेकमध्ये झोपण्याच्या जागेवरून बंदीवानांमध्ये राडा झाला. यावेळी दोन बंदीवानांनी एका बंदीवानला बेदम मारहाण केली. ही घटना शनिवार, दि. २६ रोजी रात्री सव्वा अकरा वाजता घडली. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात दोन बंदीवानवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय संभाजी आढाव, अजय संजय आढाव अशी गुन्हा दाखल झालेल्या बंदीवानची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील सर्कल क्रमांक दोन या ठिकाणी असलेल्या बॅरेकमध्ये अक्षय आढाव, अजय आढाव या बंदीवानांचा झोपण्याच्या जागेवरून सागर किसन पार्टॆ या बंदीवानाशी शाब्दिक वाद झाला होता. त्याचा राग मनात धरून अक्षय आढाव आणि अजय आढाव यांनी सागर पार्टॆ याला वीट व फरशीच्या तुकड्याने पोलिसांसमोरच मारहाण केली. या प्रकारामुळे कारागृहात खळबळ उडाली. त्यानंतर कारागृहातील कर्मचाऱ्यांनी सागर पार्टे आणि अक्षय आढाव, अजय आढाव यांना वेगवेगळ्या बराकीमध्ये ठेवले. त्यांच्यावर चोवीस तास देखरेख ठेवण्यात येत आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यातील हवालदार रंगणाथ सातव यांनी फिर्याद दिली आहे.

 

Web Title: A case has been registered against both of them in connection with the dispute over sleeping space in the prison barracks 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.