Satara- आत्महत्येस प्रवृत्त केले; कारंडवाडीच्या उपसरपंचावर गुन्हा

By नितीन काळेल | Published: September 15, 2023 01:58 PM2023-09-15T13:58:19+5:302023-09-15T13:59:22+5:30

पैशाची मागणी अन् पाैलिस केसची धमकी 

A case has been registered in the Satara taluka police station against three persons of Karandwadi who committed suicide due to the threat of a police case and demand for money | Satara- आत्महत्येस प्रवृत्त केले; कारंडवाडीच्या उपसरपंचावर गुन्हा

Satara- आत्महत्येस प्रवृत्त केले; कारंडवाडीच्या उपसरपंचावर गुन्हा

googlenewsNext

सातारा : पोलिस केसची धमकी आणि पैशाच्या मागणीतून एकाने आत्महत्या केल्याप्रकरणी कारंडवाडीच्या तिघांवर तालुका पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामध्ये उपसरपंचाचाही समावेश आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सचिन देवीदास कांबळे (रा. खेड, सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीनंतर विकास नथू साळुंखे, गणेश शंकर साळुंखे, आणि जीवन बाळासो माने (सर्व रा. कारंडवाडी, ता. सातारा) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. यामधील विकास साळुंखे हे कारंडवाडीचे उपसरपंच आहेत.

यामधील तक्रारदार सचिन कांबळे यांचे बंधू सूरज कांबळे यांनी आत्महत्या केली होती. तर तक्रारीत म्हटले आहे की, संशयितांनी पोलिस केस करण्याची धमकी देऊन आणि पैशाची मागणी करुन मानसिक त्रास दिला. यातून बंधू सूरज यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे.

सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. सहायक पोलिस निरीक्षक माने हे तपास करीत आहेत.

Web Title: A case has been registered in the Satara taluka police station against three persons of Karandwadi who committed suicide due to the threat of a police case and demand for money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.