सातारा पालिकेच्या आरोग्य निरीक्षकावर अपसंपदेचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 12:07 PM2024-06-28T12:07:17+5:302024-06-28T12:07:50+5:30

अपसंपदेचा सातारा शहरातील बहुदा हा पहिलाच गुन्हा

A case of embezzlement has been filed against the Health Inspector of Satara Municipality | सातारा पालिकेच्या आरोग्य निरीक्षकावर अपसंपदेचा गुन्हा दाखल

सातारा पालिकेच्या आरोग्य निरीक्षकावर अपसंपदेचा गुन्हा दाखल

सातारा : सातारा पालिकेचे आरोग्य निरीक्षक प्रवीण एकनाथ यादव (रा. धादमे कॉलनी, करंजे पेठ, सातारा) यांच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात अपसंपदेचा गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागार्फत दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पालिकेमध्ये एकच खळबळ उडाली आहे. अपसंपदेचा सातारा शहरातील बहुदा हा पहिलाच गुन्हा आहे.

सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आरोग्य निरीक्षक यादव यांच्याविरोधात बेहिशोबी मालमत्ता असल्याची तक्रार दाखल झाली होती. या तक्रारीची दखल घेऊन १ जानेवारी २०१० ते ८ जानेवारी २०२० यादरम्यान वेळोवेळी झालेल्या तपासणीमध्ये प्रवीण यादव यांनी एकूण उत्पन्न स्रोताच्या २८.१ टक्के अधिक संपत्ती गैर मार्गाने मिळवल्याचे स्पष्ट झाले. ही अपसंपदा ११ लाख ७० रुपये इतकी आहे. लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक विक्रम पवार यांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘ते’ प्रकरण पुन्हा चर्चेत..

पाच वर्षांपूर्वी सातारा पालिकेत अडीच लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी उपमुख्याधिकाऱ्यासह आरोग्य विभागातील तीन अधिकाऱ्यांवर कारवाई झाली होती. त्यामध्ये प्रवीण यादव यांचा समावेश होता. या प्रकरणात त्यांची लाचलुचपत विभागाकडून चौकशी सुरू होती. त्या चाैकशीत त्यांच्याकडे ११ लाखांची अपसंपदा असल्याचे निष्पन्न झाले. हे जुने प्रकरण आता पुन्हा यानिमित्ताने चर्चेत आले आहे.

Web Title: A case of embezzlement has been filed against the Health Inspector of Satara Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.