धक्कादायक! आई-वडिलांवरचा राग काढला भावाच्या मुलावर, एक वर्षाच्या चिमुकल्याला फेकलं विहिरीत

By दत्ता यादव | Published: August 6, 2022 01:44 PM2022-08-06T13:44:31+5:302022-08-06T19:17:21+5:30

चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्याच्या सख्या थोरल्या भावाचा मुलगा शलमोनला घरातून नेले. अन् चिमुकल्याला विहीरीत फेकून दिले.

A cousin killed a one year old baby by throwing it into a well in Satara | धक्कादायक! आई-वडिलांवरचा राग काढला भावाच्या मुलावर, एक वर्षाच्या चिमुकल्याला फेकलं विहिरीत

धक्कादायक! आई-वडिलांवरचा राग काढला भावाच्या मुलावर, एक वर्षाच्या चिमुकल्याला फेकलं विहिरीत

Next

सातारा : शहराचे उपनगर असलेल्या दत्तनगर कोडोली येथे अष्टविनायक कॉलनीमध्ये घरगुती वादातून सख्या चुलत्याने एक वर्षाच्या चिमुकल्याला विहीरीत टाकून त्याचा खून केला. ही धक्कादायक घटना आज, शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास उघडकीस आली. शलमोन मयूर सोनवणे असे या खून झालेल्या दुर्देवी बाळाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय मारूती सोनवणे (वय २३) याने चॉकलेट देण्याच्या बहाण्याने त्याच्या सख्या थोरल्या भावाचा मुलगा शलमोनला आज, शनिवारी सकाळी घरातून नेले. सातारा एमआयडीसी कॅनॉलजवळ असलेल्या दत्तनगर येथील विहीरीत त्याला फेकून दिले. घरातल्यांनी शलमोनचा शोध घेतला असता तो कुठेही सापडला नाही. सरतेशेवटी कॉलनीतीलच एकाला शलमोन विहीरीत असल्याचे दिसले. त्यानंतर सातारा शहर पोलीस आणि नागरिकांनी शलमोनला विहीरीतून बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

या प्रकारानंतर घरातल्यांनी माहिती घेतली असता हे घृणास्पद कृत्य त्याचा चुलता अक्षय सोनवणे याने केले असल्याचे समोर आले. कोवळ्या मुलाचा अत्यंत निर्दयपणे त्याने खून केल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी अक्षय सोनवणे याला काही तासांत अटक केली. त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने खुनाची कबुलीही दिली.

मनात राग धरून केलं कृत्य

माझे आई-वडील माझा सख्खा भाऊ मयूर सोनवणे याच्याकडेच जास्त लक्ष देतात आणि मला नेहमी वाईट नजरेने पाहातात. याचा राग मनात धरून मी माझ्या भावाच्या मुलाला विहीरीतफेकून दिले. अशी खळबळजनक कबुलीही त्याने पोलिसांकडे दिली. अक्षय सोनावणे हा  एमआयडीसीमध्ये एका कंपनीत काम करतो. तोविवाहित असून, केवळ कुटुंबातील द्वेषापोटी त्याने कोवळ्या मुलाचा जीव घेतल्याने कोडोली परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे हे अधिक तपास करीत आहेत.

मनातील खदखद जीवघेणी..

अक्षय सोनवणे हा स्वभावाने तापटच. धरसोड वृत्तीमुळे त्याने अनेक ठिकाणी काम केले. त्यामुळे घरातले त्याला फारशी किंमत देत नसत, असा त्याचा समज असायचा. त्यातच आर्इ वडील नेहमी मोठ्या भावाची बाजू घ्यायचे. याची त्याच्या मनात खदखद होती. त्यामुळेच त्याने भावाच्या मुलाचा निदर्यपणे खून केला. 

Web Title: A cousin killed a one year old baby by throwing it into a well in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.