यवतेश्वर घाटात धोकादायक दरड कोसळण्याच्या स्थितीत, तातडीने काढण्याची गरज 

By दीपक देशमुख | Published: July 17, 2023 04:53 PM2023-07-17T16:53:58+5:302023-07-17T16:57:20+5:30

बांधकाम विभागाकडून पाहणी

A dangerous fissure in Yavateshwar Ghat is in a state of escape | यवतेश्वर घाटात धोकादायक दरड कोसळण्याच्या स्थितीत, तातडीने काढण्याची गरज 

यवतेश्वर घाटात धोकादायक दरड कोसळण्याच्या स्थितीत, तातडीने काढण्याची गरज 

googlenewsNext

सातारा : जिल्हयात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. पूर्वेस पावसाची उघडीप असली तरी पश्चिमेस पावसाची संततधार सुरुच आहे. यामुळे घाटात दरड कोसळण्याचा धोका असून यवतेश्वर घाटात काही दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास महाकाय दगड रस्त्यावर आदळला होता. घाटात अजूनही काही ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे. घाटातील एकेठिकाणी धोकादायक सुळका डोंगरापासून निसटण्याच्या स्थितीत आहे. ती लवकरात लवकर काढण्याची गरज निर्माण झाली आहे. 

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखाधिकारी रविकुमार आंबेकर यांनी सांगितले की,  दुर्घटना टाळण्यासाठी बांधकाम विभागाच्यावतीने घाटातील धोकादायक ठिकाणांची पाहणी करण्यात आली आहे. याबाबत अहवाल लवकरच पाठविण्यात येणार आहे.

Web Title: A dangerous fissure in Yavateshwar Ghat is in a state of escape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.