कराडात दरोड्याचा बनाव करणारा मित्रच मुख्य सूत्रधार, टेंभू येथील 'त्या' घटनेचा पोलिसांकडून पर्दाफाश

By प्रमोद सुकरे | Published: May 6, 2023 09:36 PM2023-05-06T21:36:21+5:302023-05-06T21:36:32+5:30

त्या मित्राला ५ दिवसाची पोलीस कोठडी;  इतर तिघांचा शोधाशोध सुरू

A friend who faked the robbery in Karad was the main mastermind incident in Tembhu was exposed by the police | कराडात दरोड्याचा बनाव करणारा मित्रच मुख्य सूत्रधार, टेंभू येथील 'त्या' घटनेचा पोलिसांकडून पर्दाफाश

कराडात दरोड्याचा बनाव करणारा मित्रच मुख्य सूत्रधार, टेंभू येथील 'त्या' घटनेचा पोलिसांकडून पर्दाफाश

googlenewsNext

कराड : वाढदिवसाचा केक कापण्यासाठी निर्जनस्थळी गेलेल्या दोन मैत्रीणी आणि त्यांच्या एका मित्राला तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटल्याची घटना बुधवारी टेंभू ता.कराड येथे घडली होती. यात मित्रच मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी बनाव करणाऱ्या मित्रास २४ तासात अटक केली आहे. तर त्याच्या तीन साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. अटक केलेल्या मित्रास आज न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.सचिन कोळी असे पोलीस कोठडी सुनावलेल्या मित्राचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन कोळी हा त्याच्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जाणार होता. मात्र, ज्या मैत्रिणीचा वाढदिवस होता तिच्या मैत्रिणीस घेऊन ये असा अट्टहास सचिन याने धरला.  ती वाढदिवसाचा केक कापण्यासाठी तयार झाली. सचिन त्या दोन मैत्रिणींना आपल्या अल्टो कारमधून टेंभू येथील निर्जनस्थळी घेऊन गेला. त्याठिकाणी गेल्यानंतर संबंधित दोन्ही युवती आणि सचिन कोळी हा कारमधून उतरून बोलत थांबले होते. त्यावेळी तिथे आलेल्या तिघांनी कोयत्याचा धाक दाखवत सोने आणि मोबाईल काढून घेतले. 

दरम्यान वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या मैत्रिणीकडे त्या संशयितांनी गळ्यातील चैन काढून दे अशी मागणी केली. मात्र संबंधित युवतीकडे चैन नसल्याने संशयितांनी त्या युवतीस मारहाण केली. दरम्यान त्याच वेळेस युवतीस तिच्या आईचा फोन आला. त्यावेळी त्या युवतीने घाबरत आम्हाला अज्ञातांनी कोयत्याचा धाक दाखवून सोने काढून घेतले आहे. तुम्ही लवकर टेंभू येथील डोंगरात या असे सांगितले. त्यानंतर संशयितांनी तेथून पळ काढला. 

त्यानंतर युवतीच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सचिन कोळी व त्याच्या दोन मैत्रिणींना चौकशीसाठी बोलविले. चौकशीत सचिन कोळी हाच मुख्य संशयीत असल्याचे समोर आले आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता ५ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान सचिनच्या मित्रांचा शोध सुरू असून  अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भैरव कांबळे करीत आहेत.

Web Title: A friend who faked the robbery in Karad was the main mastermind incident in Tembhu was exposed by the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.