तुम्ही अपघात केल्याचे सांगून तरुणाला लुटले; साताऱ्यातील घटना

By नितीन काळेल | Published: March 19, 2024 06:02 PM2024-03-19T18:02:59+5:302024-03-19T18:03:15+5:30

कोयत्याचा धाक; जबरदस्तीने साडे सात हजार नेले 

A migrant youth was robbed by pretending to be an accident, incident in Satara | तुम्ही अपघात केल्याचे सांगून तरुणाला लुटले; साताऱ्यातील घटना

तुम्ही अपघात केल्याचे सांगून तरुणाला लुटले; साताऱ्यातील घटना

सातारा : सातारा शहराजवळ अपघात केल्याचा बनाव करुन कोयत्याच्या धाकाने परप्रांतिय तरुणाला लुटण्यात आले. यामध्ये सुमारे साडे सात हजारांची रक्कम जबरदस्तीने काढून नेण्यात आली. हा प्रकार काल, सोमवारी मध्यरात्री घडला असून शहर पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात जबरी चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी शिखर प्रदीप श्रीवास्तव (रा. वास्तूखंड, गोमतीनगर लखनाै, उत्तरप्रदेश. सध्या रा. यशोदा नगर सातारा) यांनी तक्रार दिलेली आहे. त्यानुसार अज्ञात चाैघा चोरट्यावर गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावरील रस्त्यावर हा प्रकार घडला. अज्ञात चाैघांनी तुम्ही अपघात केला असून त्यात आम्हाला मार लागला आहे, अशी बतावणी केली.

त्यानंतर तक्रारदार तरुणाला काेयत्याचा धाक दाखवून कारचा पाठलाग केला. तसेच कार फोडून टाकण्याची धमकी देण्यात आली. यावेळी तक्रादार तरुणाकडून जबरदस्तीने साडे सात हजार रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. त्यानंतर चाैघांनीही घटनास्थळावरुन पलायन केले.
सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक उमाप हे तपास करीत आहेत.

Web Title: A migrant youth was robbed by pretending to be an accident, incident in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.