गोड बोलून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले, अन्...; साताऱ्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 05:06 PM2023-02-16T17:06:27+5:302023-02-16T17:06:57+5:30
अल्पवयीन शाळकरी मुलावर पोक्सोचा गुन्हा
सातारा : जिल्ह्यातील एका अल्पवयीन शाळकरी मुलाने अल्पवयीनच मुलीवर अत्याचार केला. यामध्ये मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली आहे. याप्रकरणी शाहुपुरी पोलिस ठाण्यात मुलावर पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबंधित मुलगा जिल्ह्यातील एका गावचा रहिवासी आहे. त्याचे वय १५ असून तो शिक्षण घेत आहे. तर मुलगी ही साडेतेरा वर्षांची आहे. तीही जिल्ह्यातील रहिवासी आहे. संबंधित मुलाने गोड बोलून मुलीला नेत अत्याचार केले. यामध्ये अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली आहे.
यानंतर मुलीच्या नातेवाइकांकडून मुलाच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मुल्ला हे तपास करीत आहेत.