साताऱ्यात सोलर चहाचा नवीन प्रयोग, लेक लाडकी अभियानाच्या पुढाकाराने प्रकल्प सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 01:12 PM2022-08-30T13:12:59+5:302022-08-30T13:13:34+5:30

‘बदलेंगे सोच, बेटी नही बोझ’ हा विचारही चहाबरोबरच मिळणार

A new experiment of solar tea in Satara, the project started with the initiative of Lake Ladki Abhiyan | साताऱ्यात सोलर चहाचा नवीन प्रयोग, लेक लाडकी अभियानाच्या पुढाकाराने प्रकल्प सुरू

साताऱ्यात सोलर चहाचा नवीन प्रयोग, लेक लाडकी अभियानाच्या पुढाकाराने प्रकल्प सुरू

googlenewsNext

सातारा : येथील लेक लाडकी अभियान, आयआयटी, मुंबई आणि एनर्जी स्वराज्य फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त सहयोगातून पहिला सोलर चहाचा प्रयोग साताऱ्यात करण्यात आला आहे. मुक्तांगणच्या वर्षा देशपांडे, ॲड. शैला जाधव, प्रा. संजीव बोंडे, एनर्जी स्वराज्यच्या भूमिका परिहर, सिद्धी रावराणे, शीतल महाजन यांच्या उपस्थितीत या सोलर चहाच्या गाड्याचे उद्घाटन करण्यात आले.

‘इस ठेलेकी हर एक चाय, कार्बन डायऑक्साइड से बचाये’ असे घोषवाक्य घेऊन हा चहाचा गाडा सुरू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या गाड्यांची संपूर्ण निर्मिती ही महिलांनी केली असून, हा गाडाही एक महिलाच चालविणार आहे. निसर्ग वाचवण्यासाठी पर्यावरणाची, झाडे लावण्याची केवळ चर्चा करणे पुरेशी होणार नाही तर कृतिशील होऊन जीवनात, व्यवसायात दृष्टिकोन उपयोगात आणणे गरजेचे आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. त्या दिशेने पडलेले सोलर चहाचा गाडा हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

याची सर्व तांत्रिकता सांभाळून जोडणी करण्याचे काम महिलांनी केले आहे. या सोलर चहाच्या गाड्यावर पहिल्यांदा चहा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर इतर विविध खाद्यपदार्थही तयार करण्यात येणार असल्याचे सांगणात आले. या सोलर गाड्याचे यश पाहून इतर ठिकाणीही असाच गाडा तयार करण्यात येणार आहे.

यावेळी रूपाली मोहिते, सारिका पाखरे, माया पवार, स्वाती बल्लाळ, ऊर्मिला कांबळे, केतन मोहिते या सर्वांचे योगदान या उपक्रमाला असणार आहे.

चहाबरोबरच मिळणार 'विचार'

‘बदलेंगे सोच, बेटी नही बोझ’ हा विचारही चहाबरोबरच मिळणार आहे. महिलांना सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आणि निसर्गाच्या रक्षणाच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची असून, एक नवा प्रयोग सर्वांसाठीच महत्त्वाचा ठरणार आहे. आयआयटी, मुंबई येथे यावर संशोधन करण्यात आले असून, पावसाळ्यातही अपेक्षित ऊर्जा या सोलर पॅनलमधून मिळणार आहे. थेट डीसी कनेक्टरच्या माध्यमातून हे जोडण्यात आले असून, सुरक्षेच्या दृष्टीनेही काळजी घेण्यात आली आहे.

Web Title: A new experiment of solar tea in Satara, the project started with the initiative of Lake Ladki Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.