Satara: कळंत्रेवाडीत बिबट्याची जोडी सीसीटीव्हीत कैद, वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 05:46 PM2023-07-14T17:46:24+5:302023-07-14T17:59:39+5:30

परिसरात घबराट

A pair of leopards caught on CCTV in Kalantrewadi Satara, a team of forest department reached the spot. | Satara: कळंत्रेवाडीत बिबट्याची जोडी सीसीटीव्हीत कैद, वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी केली पाहणी

Satara: कळंत्रेवाडीत बिबट्याची जोडी सीसीटीव्हीत कैद, वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी केली पाहणी

googlenewsNext

अजय जाधव

उंब्रज: कळंत्रेवाडी, ता. कराड येथून जाणाऱ्या पाटण पंढरपूर राज्य मार्ग ओंलडणारी बिबट्याची जोडी सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये कैद झाली आहे. यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

कंळत्रेवाडी येथील रहिवासी माजी सैनिक सचिन सूर्यवंशी यांचा पाटण पंढरपूर राज्य मार्गालगत बंगला आहे. काल, गुरुवार (दि.१४) रात्रीच्या सुमारास त्यांच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्याची जोडी राज्यमार्ग ओलांडताना दिसली. भक्षाच्या शोधार्थ फिरणारी ही जोडी एका कुत्र्याचा पाठलाग करताना दिसून आली. दरम्यान, एका दुचाकीस्वाराच्या आडवे जात पाटण पंढरपूर राज्य मार्गावरून येथील गव्हळ नावाच्या शिवारात या बिबट्यांनी धूम ठोकली. सूर्यवंशींनी हा थरार स्वतः पाहिल्याचे सांगितले. 

दरम्यान, सदर घटनेची माहिती वनरक्षक सचिन खंडागळे, अरविंद जाधव यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. घटनास्थळी बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन यावेळी वनविभागाकडून करण्यात आले आहे. 

Web Title: A pair of leopards caught on CCTV in Kalantrewadi Satara, a team of forest department reached the spot.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.