सातारा जिल्ह्यातील कोलवडी डोंगर परिसरात बिबट्याच्या जोडीचा वावर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 12:40 PM2022-11-21T12:40:58+5:302022-11-21T12:41:22+5:30

भर रस्त्यावर दोन बिबटे ठाण मांडून असल्याचे दिसले

A pair of leopards roam in Kolwadi Dongar area of ​​Satara district | सातारा जिल्ह्यातील कोलवडी डोंगर परिसरात बिबट्याच्या जोडीचा वावर

सातारा जिल्ह्यातील कोलवडी डोंगर परिसरात बिबट्याच्या जोडीचा वावर

Next

कोरेगाव : कोरेगाव तालुक्यातील पळशी वनक्षेत्रामध्ये कोलवडी हद्दीत डोंगरामध्ये दोन बिबट्यांचा वावर असल्याचे रविवारी निदर्शनास आले. पवनचक्क्यांसाठी बनवलेल्या रस्त्यावर दोन बिबटे उन्हात बसल्याचे वाहनचालकाने पाहिले. वन विभागाच्या पथकाने खातरजमा केली आहे. परिसरातील ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांनी केले आहे.

खेड-बर्गेवाडी फाट्यापासून डोंगरमाथ्यावर पवनचक्की बसवणाऱ्या कंपन्यांनी घाटरस्ता तयार केला आहे. तो कोलवडी गावच्या हद्दीत डोंगरमाथ्यापर्यंत जातो. या रस्त्यावर रविवारी वाहनचालकाला भर रस्त्यावर दोन बिबटे ठाण मांडून असल्याचे दिसले. त्याने वाहन थांबवत, सहकाऱ्यांसह बिबट्यांचे छायाचित्रण केले. काही छायाचित्रे त्याने व्हाॅट्सॲपद्वारे परिसरात ग्रामस्थांना पाठविली. तसेच त्वरित वन विभागाला माहिती देण्यात आली. वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांनी वनपाल तानाजी मोहिते, एस. एस. निकम व वनरक्षक व्ही. बी. नरळे यांचे पथक तयार करून तत्काळ घटनास्थळी पाठविले. पथकाने बिबट्यांच्या पावलांचे ठसे पाहिले.

वनक्षेत्रपाल वैभव घार्गे यांनी सांगितले की, पळशी वनक्षेत्रात कोलवडी गावच्या हद्दीत बिबट्यांचा वावर असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामस्थांनी भयभीत न होता खबरदारी घ्यावी. बिबट्या हा रात्रीच्या वेळी सक्रिय असतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी एकटे शेतात जाणे टाळावे. पाळीव प्राण्यांना सुरक्षित व बंदिस्त ठिकाणी ठेवावे, दरवाजे व्यवस्थित लावून घ्यावेत, रात्री घराबाहेर पुरेसा उजेड ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: A pair of leopards roam in Kolwadi Dongar area of ​​Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.