पिकअपची दुचाकीला धडक; सातारा शहर ठाण्यातील पोलिस ठार
By नितीन काळेल | Updated: May 21, 2024 18:14 IST2024-05-21T18:12:51+5:302024-05-21T18:14:28+5:30
चालकावर गुन्हा नोंद

पिकअपची दुचाकीला धडक; सातारा शहर ठाण्यातील पोलिस ठार
सातारा : सातारा शहराजवळ पिकअपने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सातारा शहर ठाण्यात कार्यरत असणारे हवालदार संदीप साहेबराव कणसे हे ठार झाले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पिकअप चालकावर गुन्हा नोंद झाला आहे. तर मृत कणसे हे अंगापूर वंदन येथील रहिवाशी होते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संदीप कणसे (वय ४७, रा. अंगापूर वंदन) हे सातारा शहर पोलिस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत होते. दि. १९ मे रोजी ते दुचाकी (एमएच, ०२. सीसी, ३३१९) वरुन जात होते. शहरावजळील सातारा ते रहिमतपूर मार्गावर रस्ता क्राॅस करत असताना पिकअप (एमएच, १०. एडब्लू, ३७२१) भरधाव आली. या पिकअपची दुचाकीला जोरात धडक बसली. यमाध्ये हवालदार संदीप कणसे यांना गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना साताऱ्यातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी योगेश बापूराव कणसे (रा. अंगापूर वंदन) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार हर्षद महेंद्र कदम (रा. चाफेर, ता. पाटण) याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक शिरोळे हे तपास करीत आहेत.