डोंगरावरील वसाहतींना ‘संरक्षक भिंती’चे कवच, सातारा पालिकेकडून शासनाला ३५ कोटींचा प्रस्ताव सादर

By सचिन काकडे | Published: December 19, 2023 07:22 PM2023-12-19T19:22:35+5:302023-12-19T19:22:47+5:30

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतींना आता ‘संरक्षक भिंती’चे कवच मिळणार आहे. पालिकेने डोंगर उतारावरील धोकादायक ठिकाणांचा सर्व्हे ...

A proposal of 35 crores has been submitted to the government by the Satara municipality for the cover of protective walls for the hill settlements | डोंगरावरील वसाहतींना ‘संरक्षक भिंती’चे कवच, सातारा पालिकेकडून शासनाला ३५ कोटींचा प्रस्ताव सादर

डोंगरावरील वसाहतींना ‘संरक्षक भिंती’चे कवच, सातारा पालिकेकडून शासनाला ३५ कोटींचा प्रस्ताव सादर

सातारा : अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतींना आता ‘संरक्षक भिंती’चे कवच मिळणार आहे. पालिकेने डोंगर उतारावरील धोकादायक ठिकाणांचा सर्व्हे करुन संरक्षक भिंतीच्या कामाचा ३५ कोटींचा सुधारित आराखडा तयार करुन तो नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी सादर केला आहे.

किल्ले अजिंक्यताऱ्याच्या डोंगरउतावर अलिकडच्या आठ-दहा वर्षांत प्रचंड लोकवस्ती वाढली. केसरकर पेठ, माची पेठ तसेच बोगदा परिसरात हजारो  घरे व टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. दरवर्षी पावसाळा सुरू झाला की येथील घरांना दरड कोसळण्याचा धोका संभवतो. आतापर्यंत अनेकदा किल्ल्यावरुन महाकाय दगड वसाहतींच्या दिशेने आले असून, घरांचे नुकसान झाले आहे.

अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने आठ वर्षांपूर्वी केसरकर पेठ ते बोगदा या दरम्यान संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय घेतला होता. सुमारे २० कोटींचा प्रस्ताव तयारही करण्यात आला. मात्र, ठोस काही झाले नाही. आता प्रशासनाने पुन्हा एकदा डोंगरी भागाचा सर्व्हे करून संरक्षक भिंतीचा ३५ कोटींचा आरखडा तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

अशी होणार कामे..

  • ज्या ठिकाणी दगड अथवा दरड कोसळण्याचा धोका आहे, अशा ठिकाणीच संरक्षक भिंत बांधली जाणार आहे.
  • किल्ल्यावरुन येणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा व्हावा, यासाठी भिंतीला लागूनच नाला बांधला जाणार आहे.
  • किल्ल्यावरुन येणाऱ्या नैसर्गिक ओढ्यांना हे नाले जोडले जाणार आहेत.
  • सुमारे दोन किलोमीटर लांबीचा ही भींत असून, या भिंतीमुळे नैसर्गिक आपत्ती रोखण्यास मदत होणार आहे.

Web Title: A proposal of 35 crores has been submitted to the government by the Satara municipality for the cover of protective walls for the hill settlements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.