Satara: दरासाठी रस्त्यावर दूध ओतून आंदोलन, जोरदार घोषणाबाजी 

By दीपक शिंदे | Published: December 5, 2023 02:22 PM2023-12-05T14:22:53+5:302023-12-05T14:24:10+5:30

उंब्रज : दुधाला चांगला दर मिळावा या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी उंब्रज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती ...

A protest by pouring milk on the streets in Umbraj to demand better price for milk | Satara: दरासाठी रस्त्यावर दूध ओतून आंदोलन, जोरदार घोषणाबाजी 

Satara: दरासाठी रस्त्यावर दूध ओतून आंदोलन, जोरदार घोषणाबाजी 

उंब्रज : दुधाला चांगला दर मिळावा या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी उंब्रज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर दूध ओतून आंदोलन केले. यावेळी कॅप्टन इंद्रजीत जाधव, दूध उत्पादक शेतकरी सुरेश पाटील, अमित पाटील, निवास जाधव, कृष्णत पाटील, चंद्रकांत घाडगे, संजय साळुंखे, अनिल जाधव, अमोल पाटील यांच्यासह उंब्रज व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

यावेळी कॅप्टन इंद्रजित जाधव म्हणाले, ‘शासनाने शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या दुधाला जुलै २०२३ च्या आदेशानुसार प्रति लिटर ३४ रुपये दर जाहीर केला. हा दर दूध उत्पादित शेतकऱ्यांना मिळाला. मात्र गेल्या काही दिवसांत दूध उत्पादित शेतकऱ्यांना प्रति लिटर २८ रुपये दर देऊन शासन शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. या शासनाचा आम्ही निषेध करत आहे. शासनाने दूध दर वाढीची मागणी मान्य केली नाही तर यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. त्यास शासन जवाबदार राहील

Web Title: A protest by pouring milk on the streets in Umbraj to demand better price for milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.