Satara News: उलट्या दिशेने महामार्ग ओलांडताना दोन कारची समोरासमोर धडक, पाचजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 06:32 PM2023-05-09T18:32:48+5:302023-05-09T18:34:22+5:30

महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत

A speeding car collided with a car coming from the opposite direction, five injured; An accident took place on the Pune-Bangalore highway | Satara News: उलट्या दिशेने महामार्ग ओलांडताना दोन कारची समोरासमोर धडक, पाचजण जखमी

Satara News: उलट्या दिशेने महामार्ग ओलांडताना दोन कारची समोरासमोर धडक, पाचजण जखमी

googlenewsNext

माणिक डोंगरे

मलकापूर: भरधाव कारला उलट्या दिशेने आलेल्या कारची जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात पाचजण जखमी झाले. जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. पुणे-बंगळुरु महामार्गावर आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.    

प्रकाश नामदेव भुजबळ (वय ५५), प्रणाली प्रकाश भुजबळ (२२ दोघे रा. दहिवडी ता. माण), विनायक विजय पालगे (५३ रा. यादव गोपाळपेठ सातारा), संजय पांडुरंग पाटील, सोमनाथ अनिल साळुंखे, अशी जखमींची नावे आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.   

घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कार क्रमांक (एम.एच-११-सी.डब्ल्यू-८५२१) मधून पाचजण कोल्हापूरच्या दिशेने निघाले होते. यावेळी पुणे-बंगळुरु महामार्गावर उलट्या दिशेने महामार्ग ओलांडणाऱ्या कार क्रमांक (एम.एच-५०-एफ-६६२६)ला जोरदार धडक झाली. या धडकेत कारमधील पाचजण जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. 

अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. अपघाताची माहिती कराड शहर पोलिसांसह महामार्ग पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, जखमींना रूग्णवाहिकेने कृष्णा रूग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. अपघाताची नोंद कराड शहर पोलास ठाण्यात झाली आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A speeding car collided with a car coming from the opposite direction, five injured; An accident took place on the Pune-Bangalore highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.