Satara: दिवाळीच्या पहाटे मशालोत्सवाने उजळला सज्जनगड

By दीपक शिंदे | Published: October 31, 2024 07:17 PM2024-10-31T19:17:58+5:302024-10-31T19:19:15+5:30

दुर्गनाद प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम : पुणे, मुंबई, संभाजीनगरच्या शिवप्रेमींची उपस्थिती

A torch festival was celebrated at Sajjangad on the first morning of Diwali | Satara: दिवाळीच्या पहाटे मशालोत्सवाने उजळला सज्जनगड

Satara: दिवाळीच्या पहाटे मशालोत्सवाने उजळला सज्जनगड

परळी : फटाक्यांची आतषबाजी, हलगी-तुतारीचा निनाद आणि धगधगत्या शेकडो मशालींनी जणू काही अवघा आसमंतच उजळून निघाला होता. या वातावरणात दिवाळीच्या पहिल्या पहाटे सज्जनगडावर मशालोत्सव साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषात शेकडो धगधगत्या मशालींनी किल्ले सज्जनगडावर लख्ख प्रकाश पडला होता.

दुर्गनाद प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित करण्यात आलेला मशालोत्सव गुरुवारी पहाटे साडेतीन वाजता किल्ले सज्जनगड येथे सुरू झाला. यावेळी सातारा जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्यातून शेकडो शिवसमर्थ भक्त सज्जनगडावर दाखल झाले होते. आपला सज्जनगड आपलीच जबाबदारी, एक दिवा शिवसमर्थ चरणी या उपक्रमांतर्गत किल्ले सज्जनगड संवर्धन समूह, दुर्गनाद प्रतिष्ठानच्यावतीने हा उपक्रम आयोजित करण्यात येतो. पहाटे साडेतीन वाजता भव्य मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.

सज्जनगडावर पालखी दाखल झाल्यावर मिरवणूक अंगलाई देवी मंदिर येथे प्रदक्षिणा घालत धाब्याच्या मारुतीकडे दाखल झाली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी असा हा भव्य दिव्य सोहळा पाहण्यासाठी परळी पंचक्रोशीतील युवक दाखल झाले होते. पालखीची मिरवणूक धाब्याचा मारुती मंदिर या ठिकाणी आल्यावर या ठिकाणी चित्तथरारक असे आगीचे साहसी खेळ आयोजित करण्यात आले होते. अतित येथील मावळा प्रतिष्ठानतर्फे मर्दानी खेळ संपन्न झाल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिकृती समोर ध्येयमंत्र खड्या आवाजात म्हणण्यात आला.

वाढता प्रतिसाद..

गेल्या पाच वर्षांपासून दिवाळी पहाटनिमित्त एक दिवा शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर या संकल्पनेतून दुर्गनाद प्रतिष्ठानकडून मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. मात्र दरवर्षीपेक्षा अधिक मावळे गडावर दाखल होत आहेत. या कार्यक्रमास युवक पुरुष याचबरोबर महिला वर्गांचा तसेच युवतींचा सक्रिय सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येत होता. त्यामुळे मशालींची संख्याच अपुरी पडू लागली आहे. हे लक्षात येताच प्रतिष्ठानकडून पुढच्या वर्षी आणखी मशाली उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: A torch festival was celebrated at Sajjangad on the first morning of Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.