Gram Panchayat Elections: कराड तालुक्यातील 'दुशेरे'त कोण ठरणार 'शेर'!, चुलत भावांत सरपंच पदासाठी चढाओढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 12:10 PM2022-12-13T12:10:11+5:302022-12-13T12:10:41+5:30

दुशेरे ग्रामपंचायतीवर अनेक वर्षांपासून अपवाद वगळता धोंडिराम जाधव यांचीच सत्ता राहिली आहे.

A tough fight in Dushere Gram Panchayat elections | Gram Panchayat Elections: कराड तालुक्यातील 'दुशेरे'त कोण ठरणार 'शेर'!, चुलत भावांत सरपंच पदासाठी चढाओढ

Gram Panchayat Elections: कराड तालुक्यातील 'दुशेरे'त कोण ठरणार 'शेर'!, चुलत भावांत सरपंच पदासाठी चढाओढ

googlenewsNext

प्रमोद सुकरे

कराड : कराड शहरानजीकचे गाव म्हणजे दुशेरे. येथील ग्रामपंचायत निवडणुक १८ डिसेंबर रोजी होत आहे. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक धोंडीराम जाधव यांच्या पँनेलला रोखण्यासाठी रोखण्यासाठी विरोधकांनी आघाडी केली आहे. पण निकालात कोण 'शेर' ठरणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 

दुशेरे ग्रामपंचायतीवर अनेक वर्षांपासून अपवाद वगळता धोंडिराम जाधव यांचीच सत्ता राहिली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत निवडणुकीत जाधव यांना विरोधक एकत्र येवून घेरतात. मात्र त्यांना पुरेसे यश प्राप्त करता  आलेले दिसत नाही. यावेळच्या निवडणुकीतही जाधव यांच्या विरोधकांनी कोंडी करत ताकद लावली आहे. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण,रयत कारखान्याचे अध्यक्ष अँड. उदयसिंह पाटील - उंडाळकर, कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या गटांनी एकत्र येत महाआघाडी करुन पँनेल ठाकले आहे.

निवडणूकीत ९ जागांसाठी १८ उमेदवार रिंगणात आहेत. सरपंच पद खुल्या गटासाठी नव्हे यर ओबीसी पुरुष जागेसाठी आरक्षित आहे. तरी देखील निवडणूक अटीतटीची बनली आहे. निवडणुकीत दोन्ही गटांचा कस लागला आहे.पण निवडणूक निकालात कोण 'शेर' ठरणार हे पहाण्यासाठी थोडे थांबावेच लागेल.

सत्ताधारी भरतदास महाराज पॅनेलचे नेतृत्व कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक धोंडीराम जाधव हे करीत आहेत. त्यांना माजी संचालक माणिकराव जाधव यांच्यासह समर्थकांचे चांगले पाठबळ आहे. तर विरोधी बाळसिद्ध पॅनेलचे नेतृत्व कोयना दूध संघाचे संचालक शिवाजीराव जाधव, पांडुरंग जाधव, राजेंद्र जाधव, उत्तमराव पाटील आदी प्रमुख कार्यकर्ते करीत आहेत.

सोसायटीत केले सत्तांतर

गत वर्षभरापूर्वी गावातील विकास सेवा सोसायटीची निवडणूक पार पडली होती.खरंतर यात सत्तांतर ही बाब खूपच कठीण तरीही  यात धोंडीराम जाधव यांच्याकडे असणारी १० वर्षाची सत्ता याच विरोधी आघाडीने खेचून घेतली आहे.

आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

मतदानाची तारीख काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रचारालाच चांगला जोर चढला आहे. पदयात्रा, प्रचारसभा आणि त्यात आरोप प्रत्यारोपांच्या होणाऱ्या फैरी यावेळी ग्रामस्थांचे मनोरंजन करीत आहेत. आता यातून मतदार नेमकं काय घेणार? आणि मतदान नेमके कोणाला करणार ?हे त्यांचं त्यांनाच माहीत.

चुलत भावांत सरपंच पदासाठी चढाओढ

सत्ताधारी गटाने सरपंच पदासाठी आनंदा गायकवाड यांना रिंगणात उतरवले आहे. तर विरोधी पँनेलने त्यांचेच चुलत बंधू शंकर गायकवाड यांची उमेदवारी दिल्याने निवडणूकीत रंगत आली आहे. तर शंकर गायकवाड यांचे सख्खे बंधू महादेव गायकवाड हे प्रभाग क्रमांक  ३ मध्ये सत्ताधारी गटाकडून निवडणूक लढवत आहे. 

चुलती- पुतण्यात लढत 

या निवडणुकीत प्रभाग १ मध्ये तर चुलती व पुतण्या यांच्यात लढत होत आहे. सत्ताधारी गटाचे उमेदवार अर्जुन जाधव यांच्या विरोधात त्यांची चुलती विजया जाधव लढत आहेत. याचीही चर्चा सुरू आहे.

Web Title: A tough fight in Dushere Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.