साताऱ्यातील शिरंबे येथे अडीच एकर क्षेत्रातील ऊसाला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान
By दीपक शिंदे | Updated: November 9, 2022 23:16 IST2022-11-09T23:15:59+5:302022-11-09T23:16:42+5:30
ग्रामस्थांचे प्रसंगावधान, आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू

साताऱ्यातील शिरंबे येथे अडीच एकर क्षेत्रातील ऊसाला आग; शेतकऱ्याचे मोठे नुकसान
शिरंबे (ता. कोरेगाव) येथील सुतारमाळा नावाच्या शिवारात जयश्री बबन जाधव यांच्या गट नंबर २५० मधील अडीच एकर क्षेत्रातील ऊसाला बुधवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती समजताच ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या शिवारात सर्वत्र ऊस पीक असल्याने भीतीचे वातावरण आहे.
जाधव यांच्या अडीच एकर क्षेत्रावरील उसाला आग लागल्याची माहिती काही शेतकऱ्यांना समजली त्यांनी तातडीने गावातील प्रमुख मंडळींची माहिती दिली. त्यानंतर गावातील भोंगा वाजवला. प्रमुख चौकात ग्रामस्थ व शेतकरी जमल्यानंतर त्यांना आगीची माहिती देण्यात आली. ग्रामस्थांनी कशाचीही तमा न बाळगता प्रसंगावधान राखत तातडीने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. या क्षेत्रात सर्वत्र ऊस पीक असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण होते.