Satara- शासकीय नोकरी देण्याचे सांगत महिलेची पावणे सहा लाखांची फसवणूक, मारहाण करुन दिली जिवे मारण्याची धमकी
By नितीन काळेल | Published: March 29, 2023 03:34 PM2023-03-29T15:34:32+5:302023-03-29T15:34:58+5:30
सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद
सातारा : शासकीय नोकरी देतो असे सांगून महिलेची पावणे सहा लाख रुपयांची फसवणूक आणि मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी एका महिलेने तक्रार दिलेली आहे. त्यानुसार अब्दूल राजकर रवाठार- शेख (रा. मिरज), तेजस्वी भास्कर चव्हाण (रा. पीरवाडी, सातारा) आणि हिना अमन अफराज (रा. करंजे सातारा) यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. जुलै २०२२ ते डिसेंबर २२ च्या दरम्यान हा प्रकार घडला आहे.
अब्दुल शेखने तक्रारदार महिलेकडून शासकीय नोकरी देतो असे म्हणून रोख तसेच ऑनलाइन माध्यमातून ५ लाख ८७ हजार घेतले. यादरम्यान, मारहाण केली तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच अत्याचारही केला, असे या तक्रारीत म्हटले आहे.
सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक वाघमोडे तपास करीत आहेत.