ट्रकमधील फरशी अंगावर कोसळून कामगाराचा मृत्यू
By दत्ता यादव | Published: February 18, 2024 10:24 PM2024-02-18T22:24:25+5:302024-02-18T22:24:51+5:30
अशोककुमार चाैरासिया (वय ३०, रा. उत्तरप्रदेश) याने दहिवडी पोलिस ठाण्यात याबाबत खबर दिली आहे. पोलिस नाईक आर. पी. खाडे हे अधिक तपास करीत आहेत.
सातारा: ट्रकमधून फरशी खाली घेत असताना फरशी कोसळल्याने त्या खाली अडकून एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना माण तालुक्यातील टाकेवाडी येथे दि. १७ रोजी सायंकाळी सहा वाजता घडली.
लाैहर प्रसाद मतन प्रसाद (वय ४२, रा. गाैरखास उरूबाबाजार, गोरखपूर, उत्तरप्रदेश, सध्या रा. टाकेवाडी, ता. माण) असे मृत्यू झालेल्या परप्रांतीय कामगाराचे नाव आहे. याबाबत दहिवडी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, टाकेवाडी येथील एका दुकानासमोर ट्रकमधून फरशी खाली उतरण्याचे काम सुरू होते. लाैहर प्रसाद हे एक-एक फरशी डोक्यावर घेऊन खाली उतरत होते. त्यावेळी अचानक फरशींचा ढीग खाली कोसळला. यात प्रसाद अडकले. त्यांच्या डोक्याला, हाता पायाला गंभीर जखम झाली. काही कामगारांनी त्यांना फरशीखालून बाहेर काढले. त्यानंतर तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अशोककुमार चाैरासिया (वय ३०, रा. उत्तरप्रदेश) याने दहिवडी पोलिस ठाण्यात याबाबत खबर दिली आहे. पोलिस नाईक आर. पी. खाडे हे अधिक तपास करीत आहेत.