अज्ञात वाहनाच्या धडकेत शिरवळचा तरुण ठार, वाहन चालक पसार 

By दीपक शिंदे | Published: June 27, 2023 03:54 PM2023-06-27T15:54:48+5:302023-06-27T15:55:24+5:30

सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर येथील कणसे ढाब्यासमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील रघुनाथ विठ्ठल मोपरे (वय ३१, रा. ...

A youth from Shirwal was killed in a collision with an unknown vehicle, the driver escaped | अज्ञात वाहनाच्या धडकेत शिरवळचा तरुण ठार, वाहन चालक पसार 

अज्ञात वाहनाच्या धडकेत शिरवळचा तरुण ठार, वाहन चालक पसार 

googlenewsNext

सातारा : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर येथील कणसे ढाब्यासमोर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील रघुनाथ विठ्ठल मोपरे (वय ३१, रा. शिरवळ, ता. खंडाळा) हा तरुण ठार झाला. हा अपघात सोमवार, दि. २६ रोजी झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रघुनाथ मोपरे हा दुचाकीवरून शिरवळकडे निघाला होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्याला जाेरदार धडक दिली. त्यानंतर संबंधित वाहन तेथून पसार झाले. या अपघातात रघुनाथ मोपरे हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

भरत विठ्ठल मोपरे (वय ३५, रा. शिरवळ, ता. खंडाळा) याने तक्रार दिल्यानंतर सातारा शहर पोलिसांनी अज्ञात चारचाकी वाहन चालकावर गुन्हा दाखल केला. हवालदार कारळे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A youth from Shirwal was killed in a collision with an unknown vehicle, the driver escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.