पुसेगावसह परिसरातील गरजूंना ‘श्री सेवागिरी थाळी’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:27 AM2021-06-03T04:27:46+5:302021-06-03T04:27:46+5:30

पुसेगाव : कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत बेघर, परप्रांतीय, प्रवासी, दैनंदिन बाजार भरू न शकणाऱ्या दिव्यांग किंवा निराधार नागरिकांची ...

Aadhaar of 'Shri Sevagiri Thali' for the needy in the area including Pusegaon | पुसेगावसह परिसरातील गरजूंना ‘श्री सेवागिरी थाळी’चा आधार

पुसेगावसह परिसरातील गरजूंना ‘श्री सेवागिरी थाळी’चा आधार

Next

पुसेगाव : कोरोनामुळे निर्माण झालेल्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत बेघर, परप्रांतीय, प्रवासी, दैनंदिन बाजार भरू न शकणाऱ्या दिव्यांग किंवा निराधार नागरिकांची जेवणाची सोय व्हावी म्हणून लोकसहभागातून पुसेगावसह परिसरातील विविध भागात ‘श्री सेवागिरी थाळी’ पुरविण्यात येणार आहे. मंगळवार (दि. १)पासून दररोज सकाळी आणि सायंकाळी स्वयंसेवकांकडून हे जेवण गरजूंना विनामूल्य पुरविण्यात येत असल्याने सर्वस्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची मुदत वाढल्यानंतर हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांची जेवणाची परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यातच मेस, खानावळी, हॉटेल बंद असल्याने प्रवासी, निराधार नागरिकांना पैसे असूनही जेवण मिळणे कठीण झाले आहे. यावर उपाय म्हणून एका कॉलवर गरजूंना श्री सेवागिरी जेवणाची थाळी पुरविण्यात येणार आहे. सुश्रुत जाधव, भैया फडतरे, सचिन देशमुख, विशाल जाधव, मनोज राऊत, अमजद मुलाणी, संगीता जाधव, आदी स्वयंसेवकांनी दोन्हीवेळचे जेवण गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

०२पुसेगाव

पुसेगाव (ता. खटाव) येथे ‘श्री सेवागिरी थाळी’चा प्रारंभ मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांनी केला. यावेळी सुनील जाधव, गणेश बोबडे, सुश्रुत जाधव, आदी उपस्थित होते.

Web Title: Aadhaar of 'Shri Sevagiri Thali' for the needy in the area including Pusegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.