शिवसमर्थ करोना केअर सेंटर रुग्णांसाठी आधारवड : पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:26 AM2021-07-01T04:26:50+5:302021-07-01T04:26:50+5:30
सातारा : शिवसमर्थ करोना केअर सेंटर ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आधारवड ठरत असल्याचे समाधान आहे, असे मत पालकमंत्री बाळासाहेब पाटील ...
सातारा : शिवसमर्थ करोना केअर सेंटर ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आधारवड ठरत असल्याचे समाधान आहे, असे मत पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
लिंबखिड ता. सातारा येथील केबीपी महाविद्यालयात सातारा पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या शिवसमर्थ करोना केअर सेंटरला पालकमंत्री पाटील यांनी भेट देऊन उपाययोजनांची पाहणी केली. याप्रसंगी पाटील बोलत होते. यावेळी राज्य लेखा समितीचे सदस्य शहाजी क्षीरसागर, सभापती सरिता इंदलकर, शिवसमर्थ मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे व्यवस्थापक हेमंत तुपे, सातारा मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील, डॉ. आसिफ इनामदार, टॉप गिअर कंपनीचे व्यवस्थापक शशिकांत पवार, तहसीलदार आशा होळकर, गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. जी. पवार, स्वयंम संस्थेचे मनोज विधाते आदी उपस्थित होते.
लोकसहभागातून सुरु करण्यात आलेल्या या सेंटरमध्ये सातारा तालुक्यातील ग्रामीण भागातील रुग्णांची चांगली सोय झाली आहे. काम करण्याची जिद्द असेल तर ते काम निश्चितच यशस्वी होते याचा प्रत्यय या सेंटरच्या उभारणीतून आला आहे. या सेंटरला सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही ना. पाटील यांनी यावेळी दिली.
सरिता इंदलकर यांनी सेंटरबाबत माहिती देवून अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्यातून हे सेंटर उदयास आल्याचे सांगितले. यावेळी शिवसमर्थ अन्नछत्र समितीचे पदाधिकारी, सरपंच विनोद शिंदे, अमोल गोगावले, अनिल सोनमळे, धर्मेंद्र सावंत, नवनाथ ननावरे, अविनाश सावंत, सचिन कांबळे, स्वयम सामाजिक संस्था, कृषी पदवीधर युवा संघटना, प्रेरणा फाउंडेशनचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. संभाजी इंदलकर यांनी स्वागत केले. मनोज विधाते यांनी आभार मानले.
फोटो -
लिंबखिंड, सातारा येथील शिवसमर्थ कोरोना केअर भेटीप्रसंगी बाळासाहेब पाटील. यावेळी सरिता इंदलकर, हेमंत तुपे, मनोज विधाते व इतर.
...............