विनयभंग प्रकरणात अभिजित देशमानेला एक वर्ष सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:40 AM2019-03-30T11:40:36+5:302019-03-30T11:42:11+5:30
पुसेसावळी, ता. खटाव येथील अभिजित नंदकुमार देशमाने याला महिलेच्या विनयभंग प्रकरणाच्या खटल्यात प्रथम न्यायदंडाधिकारी एस. एम. झाटे यांनी एक वर्ष सक्तमजुरी आणि अकरा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
औंध : पुसेसावळी, ता. खटाव येथील अभिजित नंदकुमार देशमाने याला महिलेच्या विनयभंग प्रकरणाच्या खटल्यात प्रथम न्यायदंडाधिकारी एस. एम. झाटे यांनी एक वर्ष सक्तमजुरी आणि अकरा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पुसेसावळी, ता. खटाव येथील महिलेच्या विनयभंग करून तिच्या पतीस मारहाण केली होती, याबद्दल औंध पोलीस स्टेशनमध्ये ६ आॅगस्ट २०१६ रोजी औंध पोलीस स्टेशनमध्ये विवाहितेच्या विनयभंगप्रकरणी अभिजित याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. झाटे यांनी साक्षीदारांची साक्ष, सरकारी अभियोक्ता यांचा युक्तिवाद पुरावा ग्राह्य मानून आरोपी अभिजित नंदकुमार देशमाने याला एक वर्ष सक्तमजुरी आणि अकरा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.