मेढा नगरपरिषदेत संख्याबळ नसतानाही भाजप ‘पॉवरफुल्ल’

By admin | Published: June 30, 2017 01:33 PM2017-06-30T13:33:05+5:302017-06-30T13:33:05+5:30

प्राची कदम यांची स्वीकृत नगरसेवक : निवडीने भाजपाला मिळाले बळ

In the absence of strength in the Meghna Municipal Council, the BJP is 'Powerful' | मेढा नगरपरिषदेत संख्याबळ नसतानाही भाजप ‘पॉवरफुल्ल’

मेढा नगरपरिषदेत संख्याबळ नसतानाही भाजप ‘पॉवरफुल्ल’

Next

आॅनलाईन लोकमत

सायगाव ( जि. सातारा) , दि. ३0 : मेढा नगरपंचायतीत केवळ एकच नगरसेवक असतानाही स्विकृत नगरसेवकपदी भारतीय जनता पार्टीच्या वतीने डॉक्टर प्राची कदम यांच्या अनपेक्षित निवडीने मेढा नगरपंचायतमधे भाजपा ‘पॉवर फुल्ल’ ठरली आहे.

एकमेव निवडून आलेले नगरसेवक विकास देशपांडे यांच्या बळावर स्विकृत नगरसेवक पद मिळवून आपली सदस्य संख्या दोनवर पोहचवली आहे. यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मेढा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीवेळी भाजपा चे नगरसेवक विकास देशपांडे, शिवसेनेचे पुरस्कृत नगरसेवक तांबे यांचे अर्ज भरले असताना दोन्ही पक्षांच्या वतीने एकत्रित निवडणूक प्रक्रिया पार पडली होती. यावेळी भाजपा चे नगरसेवक विकास देशपांडे यांना अनेक अमिषे दाखवली असताना देखील ते शिवसेनेबरोबर ठाम राहिले. तसेच उपनगराध्यक्ष पदाची संधी देखील सोडली. पण स्विकृत नगरसेवक पदाच्या निवडीवेळी शिवसेनेच्या वतीने कोणताही अर्ज दाखल केला नसल्याने भाजपा च्या वतीने नगरसेवक विकास देशपांडे यांनी पक्षाच्या आदेशानुसार डॉक्टर प्राची कदम यांचा अर्ज दाखल केला. तो अर्ज ग्राह्य धरून निवडणूक अधिकार्यांनी त्यांची स्विकृत नगरसेवक पदी निवड केली.

यामध्ये मित्रपक्ष शिवसेनेला दुखवण्याचा कोणताही उद्देश नव्हता. आलेल्या संधीनुसार ही निवड झाल्याने यामध्ये नियमबाह्य काहीही झालेले नाही. पन याबाबत चुकीची भूमिका मांडली जात आहे.

कदम यांना राजकीय घराण्याचा वारसा असून माजी आमदार जी. जी. कदम यांच्या घराण्यातील स्नुषा आहेत. त्यांच्या निवडीबद्दल महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी आमदार सदाशिव सपकाळ, जि. प. सदस्य दिपक पवार, अमितदादा कदम, विजयआप्पा शेलार, विकास देशपांडे, विठ्ठल देशपांडे, दत्तात्रय साळुंखे, जितेंद्र पंडित, दिपक कदम आदी मान्यवरांनी कौतुक केले.



देशपांडेंची भूमिका निर्णायक



मेढा नगरपंचयातीत विकास देशपांडे हे भाजप चे एकमेव नगरसेवक निवडून गेल्याने जावळीत भाजपचे कमळ फुललेले आहे.तर याच देशपांडे यांच्या निर्णायक भूमिकेमुळेच मेढा नगरपंचयातीत स्वीकृत नगरसेवक पद मिळवण्यात यश आल्यामुळे भाजप चे नगरपंचयातीतील संख्याबळ दोन झाल्यामुळे पक्षाला तालुक्याच्या राजकारणात चांगलीच बळकटी मिळाली आहे.

Web Title: In the absence of strength in the Meghna Municipal Council, the BJP is 'Powerful'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.