सातारकरांना पुढच्या वर्षी मुबलक पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:49 AM2021-07-07T04:49:23+5:302021-07-07T04:49:23+5:30

सातारा : नवीन कास धरण हा सातारा पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली धरणाचे काम ...

Abundant water to Satarkar next year | सातारकरांना पुढच्या वर्षी मुबलक पाणी

सातारकरांना पुढच्या वर्षी मुबलक पाणी

Next

सातारा : नवीन कास धरण हा सातारा पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली धरणाचे काम गतीने सुरू आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्णत्वास येईल व सातारकरांना मुबलक पाणी मिळेल,’ असा विश्वास नगराध्यक्षा माधवी कदम यांनी व्यक्त केला.

सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाची मंगळवारी सकाळी पालिकेकडून परंपरेनुसार ओटी भरण्यात आली. या वेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणीपुरवठा सभापती सीता हादगे, नियोजन सभापती स्नेहा नलवडे, नगरसेविका स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक, राम हादगे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नगराध्यक्षा म्हणाल्या, ‘कास तलाव यंदा पंधरा दिवस अगोदरच तुडुंब भरला. त्यामुळे सातारकरांची पाणीटंचाईच्या संकटातून सुटका झाली. नवीन कास धरणाचे काम पावसाळ्यामुळे बंद आहे. पाऊस उघडताच हे काम पुन्हा गतीने सुरू होईल. धरण मार्गी लागल्यानंतर त्यात सध्याच्या तुलनेत पाचपट पाणीसाठा वाढणार आहे. त्यामुळे सातारकरांना पालिकेकडून मुबलक पाणीपुरवठा केला जाईल. उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी कास धरणाच्या कामाबाबत समाधान व्यक्त करून खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली धरणाचे काम वेळेत मार्गी लावण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

(चौकट)

पाणीकपात न केल्याचे समाधान : सीता हादगे

दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की पालिकेला पाणीकपातीचा निर्णय घ्यावा लागतो. यंदा पाणीपुरवठा विभागाने केलेल्या उत्तम नियोजनामुळे नागरिकांवर पाणीकपातीचे संकट ओढावले नाही, याचे समाधान वाटत आहे. सांबरवाडी तसेच शहापूर येथील जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता केली असून, नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला असला तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी केले.

फोटो : ०६ कास तलाव

सातारा पालिकेकडून मंगळवारी कास तलावाची ओटी भरण्यात आली. या वेळी माधवी कदम, सीता हादगे, स्नेहा नलवडे, स्मिता घोडके, सुजाता राजेमहाडिक आदी उपस्थित होते. (छाया : जावेद खान)

Web Title: Abundant water to Satarkar next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.