Satara: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला २० वर्ष कारावास, दीड लाख रुपये दंडाची शिक्षा

By दीपक शिंदे | Published: July 31, 2024 12:17 PM2024-07-31T12:17:52+5:302024-07-31T12:18:19+5:30

कऱ्हाड न्यायालयाचा निकाल 

Abuse of minor girl; The youth was sentenced to 20 years imprisonment | Satara: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला २० वर्ष कारावास, दीड लाख रुपये दंडाची शिक्षा

Satara: अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तरुणाला २० वर्ष कारावास, दीड लाख रुपये दंडाची शिक्षा

कऱ्हाड : अल्पवयीन मुलीला पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तरुणाला वीस वर्ष कारावास आणि दीड लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्या. के. एस. होरे यांनी ही शिक्षा सुनावली.

रोहित रमेश थोरात असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. पाटण तालुक्यातील एका गावात २०२२ मध्ये ही घटना घडली होती. सरकार पक्षाने दिलेल्या माहितीनुसार, ४ फेब्रुवारी २०२२ रोजी साडेपंधरा वर्षांची अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. ती शाळेत गेली होती. मात्र, ती शाळेतून घरी परत न आल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. यावेळी ती न सापडल्याने तिला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची खात्री पटल्यानंतर याबाबत कुटुंबियांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांना तपासात रोहित थोरात याच्याबद्दल माहिती मिळाली. त्यांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तो बारामती भागात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन त्याला अटक केली.

रोहित थोरात याने संबंधित पीडित मुलीसोबत मैत्री करून तिला पळवून नेल्याचे पोलिस तपासातून समोर आले. पीडित मुलीच्या गळ्यातील सोन्याची चेन ज्वेलर्सच्या दुकानात विकून ते पुणे येथे गेले होते. त्यानंतर सासवड येथे पोलिसांनी त्यांना पकडले. त्यावेळी रोहित थोरात याच्याविरोधात बाललैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमासह अन्य गुन्हे दाखल झाले होते.
या खटल्याची सुनावणी येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती.

खटल्यात सरकार पक्षातर्फे ॲड. आर. सी. शहा यांनी काम पाहिले. त्यांनी आठ साक्षीदार तपासले. शिक्षेवरील युक्तिवादासह तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक एम. एस. तलबार, ज्वेलर्स दुकान मालक यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. त्यानुसार अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. होरे यांनी रोहित थोरात याला या गुन्ह्यात दोषी धरून वेगवेगळ्या कलमांद्वारे २० वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेतून ७५ हजारांची नुकसानभरपाई पीडित मुलीला देण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

Web Title: Abuse of minor girl; The youth was sentenced to 20 years imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.