गैरवर्तन केल्यास शिवशाहीचा चालक हद्दपार! प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कठोर पावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 11:38 PM2018-05-31T23:38:47+5:302018-05-31T23:38:47+5:30
सातारा : खासगी कंपनीच्या शिवशाही गाड्या परिवहन महामंडळाने भाडेतत्वावर घेतल्या असून, त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता प्रवाशांशी असभ्य वर्तन करणाऱ्या शिवशाहीच्या चालकांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे, असा निर्णय एसटीने घेतला आहे. दरम्यान, बोरिवलीहून साताºयाला येणाºया शिवशाहीच्या संबंधित मद्यपी चालकाला काळ्या यादीत टाकले आहे.
राज्यातील प्रत्येक गावात गेल्या सहा दशकांहून अधिक काळ एसटीनं सेवा केली आहे. दि. १ जून रोजी एसटीचा ७० वा स्थापना दिन आहे. आतापर्यंतच्या वाटचालीत एसटीने अनेक बदल स्वीकारले. तर खासगीकरणाला तोंड देत असताना दुरावलेल्या प्रवाशांना पुन्हा एसटीकडे आणण्यासाठी सकारात्मक बदल करणे क्रमप्राप्त होते. परिवर्तनाच्या या मालिकेतीलच अलीकडील सर्वात मोठा टप्पा म्हणजे खासगी कंपनीच्या शिवशाही गाड्या भाडेतत्वावर चालवायला घेणे. या गाड्या आधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेल्या असल्याने त्यावरील चालक खासगी कंपनीचाच आहे. तर केवळ वाहक हा परिवहन महामंडळाचा असतो.
एसटीचा प्रवासी खºया अर्थाने खेडोपाड्यातील सर्वसामान्य माणूस आहे. त्याचा खाकी गणवेशातील चालकावर विश्वास आहे. तर अलीकडे खासगी चालक आले आहेत. त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा?, कारण अलीकडे चुकीच्या घटना घडत आहेत.
गेल्या काही दिवसांत राज्यात शिवशाही गाड्यांच्या अपघाताच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत आहेत. बोरीवली-सातारा या शिवशाही गाडीतील चालक मद्यपान केलेल्या स्थितीत आढळला होता. त्या ठिकाणी पर्यायी चालक दिला. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येणे क्रमप्राप्त होते. एसटीने नेहमीप्रमाणे संबंधित चालकाविरोधात अहवाल तयार केला गेला. तो मिळाल्यानंतर सातारा विभागाने संबंधिताला कामावरून कमी केले.
चालक देणाºया संबंधित कंपनीलाही ही माहिती देण्यात आली. तसेच इतर अन्य सार्वजनिक प्रवासी करणाºया कंपनीलाही ही माहिती दिली. त्यामुळे त्या चालकाला कायमस्वरूपी काळ्या यादीत टाकले, अशी माहितीही विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी दिली आहे.
एसटी चालकांनाही प्रशिक्षण...
सातारा विभागाच्या ताफ्यात ११ शिवशाही गाड्या असून, त्यातील सहा या एसटीच्या मालकीच्या तर पाच भाडेतत्वावरील आहेत. एसटीच्या स्वत:च्या शिवशाहीला त्यांचाच चालक आहे. तसेच विभागातून एकाला मास्टर प्रशिक्षण देण्यात आले आहे. तो प्रत्येक आगारात जाऊन अन्य चालकांना शिवशाही गाड्या चालविण्याचे प्रशिक्षण देत आहे. त्यामुळे भविष्यात शिवशाही गाड्यांचे प्रमाण वाढले तरी एसटीचेच चालक पाहायला मिळाले तर नवल वाटायला नको. कारण, भविष्याची ही पेरणी आहे.
एसटीच्या वर्धापन दिनानिमित्ताने ज्येष्ठ नागरिकांनाही शिवशाही गाड्यांमधून सवलती देऊ केल्या आहेत. सातारा-बोरिवली ही सेवा पूर्णपणे शिवशाहीवर चालवणे व सातारा-मुंबई मार्गावर अधिकाधिक शिवशाही गाड्या चालविण्याचा संकल्प केला आहे. त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात येणार आहे.
- सागर पळसुले, विभाग नियंत्रक