Satara: पत्नीला लहान मुलीसमोर शिवीगाळ करणं भोवलं; 'पोक्सो'चा गुन्हा दाखल
By दत्ता यादव | Published: February 7, 2024 01:37 PM2024-02-07T13:37:28+5:302024-02-07T13:38:33+5:30
सातारा : स्वत:च्या १३ वर्षांच्या मुलीसमोर पत्नीला अश्लील शिवीगाळ करणे पतीला भोवलं असून, त्याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात विनयभंगसह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सातारा ...
सातारा : स्वत:च्या १३ वर्षांच्या मुलीसमोर पत्नीला अश्लील शिवीगाळ करणे पतीला भोवलं असून, त्याच्यावर सातारा शहर पोलिस ठाण्यात विनयभंगसह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सातारा शहरात रविवारी (दि. ४) घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला ३३ वर्षांची असून, राहत्या घरात तिच्या पतीने १३ वर्षांच्या लहान मुलीसमोर ‘तुझी आई अडाणी आहे,’ असे म्हणत अत्यंत खालच्या भाषेत अश्लील शिवीगाळ केली. तसेच रागाच्या भरात पत्नीच्या डोक्याचे केस उपटून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा सर्व प्रकार त्यांच्या १३ वर्षांच्या मुलीसमोरच घडला.
त्यामुळे मुलीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याने बापावर विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. पोलिस उपनिरीक्षक जाधव हे अधिक तपास करीत आहेत.