आंतरमशागतींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:26 AM2021-07-02T04:26:15+5:302021-07-02T04:26:15+5:30

अध्यक्षपदी संदीप भागवत सातारा : रोटरी क्लब ऑफ साताराच्या अध्यक्षपदी उद्योजक संदीप भागवत, सचिवपदी शशिकांत रसाळ, खजिनदारपदी किशोर डांगे ...

Accelerate intercropping | आंतरमशागतींना वेग

आंतरमशागतींना वेग

Next

अध्यक्षपदी संदीप भागवत

सातारा : रोटरी क्लब ऑफ साताराच्या अध्यक्षपदी उद्योजक संदीप भागवत, सचिवपदी शशिकांत रसाळ, खजिनदारपदी किशोर डांगे यांची निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचे समाजातील विविध स्तरांतून कौतुक होत आहे.

साताऱ्यात आंदोलन

सातारा : ओबीसींचे पदोन्नतीमधील आरक्षण पूर्ववत करावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी यासह इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी व ओबीसी अलुतेदार बलुतेदार विकास परिषदेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, संदीप कांबळे, बाळकृष्ण देसाई, गणेश कारंडे, संजय करपे आदी उपस्थित होते.

पार्किंग कक्षाची मागणी

सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात येणाऱ्या शासकीय वाहन चालकांसाठी सुसज्ज पार्किंग तळ उभारण्याची मागणी कास्ट्राईब शासकीय व निमशासकीय वाहनचालक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी विजय विसापुरे, उपाध्यक्ष सचिन राऊत, सचिव राहुल तुपे, कोषाध्यक्ष प्रवीण सोनावणे आदी उपस्थित होते.

नळ कनेक्शन द्या

सातारा : जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी व प्राथमिक शाळांना नळ कनेक्शन देऊन पाणीपुरवठा करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिल्या आहेत. स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशनचा आढावा झेडपी अधिकाऱ्यांनी घेतला, त्यावेळी हे आदेश देण्यात आले.

Web Title: Accelerate intercropping

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.