खड्डेमय रस्त्याचा दुसरा बळी, लोणंदमधील पोलिसाचा अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 05:38 PM2019-09-04T17:38:04+5:302019-09-04T17:39:20+5:30
लोणंद येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस नाईक अतुल श्रीरंग गायकवाड (मूळगाव गमेवाडी, चाफळ, सध्या रा. लोणंद पोलीस वसाहत) हे साताऱ्यातून कार्यालयीन काम संपवून लोणंदकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यातच यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.
लोणंद : येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस नाईक अतुल श्रीरंग गायकवाड (मूळगाव गमेवाडी, चाफळ, सध्या रा. लोणंद पोलीस वसाहत) हे साताऱ्यातून कार्यालयीन काम संपवून लोणंदकडे जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. यातच यांचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास घडली.
याबाबत माहिती अशी, लोणंद येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे अतुल गायकवाड हे मंगळवारी रात्री उशिरा कार्यालयीन कामे आटोपून साताºयाहून लोणंदकडे दुचाकीवरून येत होते. कोपर्डे, ता. खंडाळा एसटी स्टँड व सालपे माध्यमिक विद्यालयाच्या दरम्यान बुधवारी मध्यरात्री एकच्या सुमारास त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळल्याने ते रस्त्यावर पडले.
या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती लोणंद पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर गायकवाड यांना प्राथमिक आरोग्य केंद्र्रात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले.
दरम्यान, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनीही प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना भेट दिली. याबाबतचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी करीत आहेत.
रस्त्यावर खड्डेच खड्डे..
लोणंद-सातारा या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून, एका पोलिसाला खराब रस्त्यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. या खराब रस्त्याने हा दुसरा बळी घेतला आहे.