सह्याद्री कारखान्याचे ऊस वजनकाटे अचूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:39 AM2021-01-25T04:39:50+5:302021-01-25T04:39:50+5:30

यावेळी नायब तहसीलदार विजय माने, कारखान्याचे चीफ इंजिनिअर एस. एस. पाटील, शेती अधिकारी मोहनराव पाटील, प्रकाश सोनवणे, वसंतराव चव्हाण, ...

Accurate cane weighing of Sahyadri factory | सह्याद्री कारखान्याचे ऊस वजनकाटे अचूक

सह्याद्री कारखान्याचे ऊस वजनकाटे अचूक

Next

यावेळी नायब तहसीलदार विजय माने, कारखान्याचे चीफ इंजिनिअर एस. एस. पाटील, शेती अधिकारी मोहनराव पाटील, प्रकाश सोनवणे, वसंतराव चव्हाण, संजय चव्हाण, बळवंत नलवडे, प्रकाश कुंभार, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, उपाध्यक्ष सुनील कोळी, विश्वास जाधव, रयत क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक लोहार, तळबीड पोलीस स्थानकाचे गणेश राठोड, शुभांगी माने उपस्थित होते.

सह्याद्री कारखान्याकडे गळितासाठी येणाऱ्या उसाचे भर व रिकामे वजन करण्यासाठी एकूण चार अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वजनकाटे आहेत. या तपासणीवेळी कारखान्यावर गळितासाठी ऊस घेऊन आलेल्या बैलगाडी व ट्रॅक्टर अशा उसाने भरलेल्या वाहनांचे अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर वजन करण्यात आले. पथकाने कारखान्याकडील उपलब्ध असलेल्या २० किलो क्षमतेच्या २५० नगांचे एकूण ५ हजार किलोग्रॅम प्रमाणित वजनाने सर्व इलेक्ट्रॉनिक काट्यांच्या अचूकतेसाठी तपासणी केली. प्रत्येक काट्याच्या बाहेरील बाजूस ऊस उत्पादक व वाहनधारकास दिसण्यासाठी जम्बो डिस्प्ले बसविण्यात आले असल्याचे निदर्शनास आले. तसेच तपासणीपूर्वी उसाने भरलेल्या गाड्यांचे वजन करून गव्हाणीकडे गेलेल्या गाड्या पथकातील प्रतिनिधींनीकडून परत इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर फेरवजन करण्यासाठी बोलाविण्यात आल्या. त्या वाहनांचे फेरवजन करून निरीक्षणे नोंदविण्यात आली.

या पथकाने विविध निकषांच्या आधारे तपासणी केली आणि ऊस वजनकाटे अचूक असल्याचे प्रमाणपत्र या पथकाकडून कारखान्यास देण्यास आले. त्यामुळे कारखान्यातील ऊस वजन काट्याच्या विश्वासार्हतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

फोटो : २४केआरडी०५

कॅप्शन : यशवंतनगर, ता. कऱ्हाड येथे सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वजन काट्याची तपासणी वैधमापनशास्त्राचे निरीक्षक आर. पी. आकरे, विजय माने यांनी केली.

Web Title: Accurate cane weighing of Sahyadri factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.