विविध १४ गुन्हे नोंद आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:43 AM2021-01-13T05:43:24+5:302021-01-13T05:43:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : साताऱ्यासह पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत १४ गुन्हे दाखल असलेल्या व चार वर्षांपासून ...

Accused arrested for 14 different offenses | विविध १४ गुन्हे नोंद आरोपीला अटक

विविध १४ गुन्हे नोंद आरोपीला अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : साताऱ्यासह पुणे जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांत १४ गुन्हे दाखल असलेल्या व चार वर्षांपासून फरार असलेल्या चोरट्यास सातारा तालुका पोलिसांनी पुण्यात जेरबंद केले. इंद्रजित मोहन गुरव (वय ३०, रा. कोंडवे, ता. सातारा) असे त्याचे नाव आहे. तसेच गुरवबरोबरच त्याच्याकडून चोरीतील लॅपटॉप विकत घेणाऱ्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सजन हंकारे यांना रेकॉर्डवरील फरार आरोपींचा शोध घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक हंकारे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेस कारवाईबाबात सांगितले होते. या दरम्यान पोलीस पथकाला इंद्रजित गुरव हा पुणे येथे असल्याची माहिती मिळाली होती. त्याच्यावर सातारा शहर, सातारा तालुका, शाहूपुरी, वाई व बारामती (पुणे) पोलीस ठाण्यात जबरी चोरी, चोरी, घरफोडी व आर्म अ‍ॅक्ट अशा विविध कलमांनुसार गुन्हे दाखल आहेत. तसेच गेल्या चार वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. तालुका पोलिसांनी अत्यंत कौशल्याने त्याचा तपास केला. त्यानंतर पुण्यात त्याला थरारक पाठलाग करून जेरबंद करण्यात आले. त्याच्याकडून सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील लॅपटॉपही जप्त करण्यात आला आहे.

सातारा तालुका पोलीस ठाण्यातील निरीक्षक सजन हंकारे, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित चौगुले, गुन्हे प्रकटीकरण शाखेतील हवालदार दादा परिहार, सुजित भोसले, नीलेश जाधव, सागर निकम, सतीश पवार, नितीराज थोरात यांनी या कारवाईत सहभाग घेतला.

फोटो दि. १२सातारा पोलीस स्टेशन फोटो...

फोटो ओळ : सातारा तालुका पोलिसांनी चार वर्षांपासून फरार असणाऱ्या चोरट्याला अटक केली. त्याचबरोबर चोरीचा लॅपटॉप विकत घेणाऱ्यालाही ताब्यात घेतले आहे.

........................................................

Web Title: Accused arrested for 14 different offenses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.