विकृतीचा कळस! सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात शस्त्रास्त्रांसह फिरणाऱ्या आरोपींचा घोरपडीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 10:11 PM2022-04-06T22:11:19+5:302022-04-06T22:12:03+5:30

शिकाऱ्यांनी शिकार केलेल्या प्राण्यांचेही मोबाईलमध्ये रॅकॉर्डिंग केल्याची माहिती आली समोर.

Accused walking around with arms at Sahyadri Tiger Project raped on bengal monitor lizard | विकृतीचा कळस! सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात शस्त्रास्त्रांसह फिरणाऱ्या आरोपींचा घोरपडीवर बलात्कार

विकृतीचा कळस! सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात शस्त्रास्त्रांसह फिरणाऱ्या आरोपींचा घोरपडीवर बलात्कार

googlenewsNext

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात गोठणे येथील गाभा क्षेत्रात शस्त्रास्त्रांसह फिरणाऱ्या व कोठडीतील आरोपींपैकी एका आरोपीने चक्क घोरपडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांच्याच मोबाईल वरील रेकॉर्डिंवरून वनाधिकाऱ्यांना ही माहिती मिळाली. घोरपडीसारख्या साडेचार फूटांच्या प्राण्यासोबत असे कृत्य करणाऱ्याला आता वनविभाग मानसोपचार तज्ज्ञांच्या हवाली करण्याची तयारी करत आहे. ही घटना वन गुन्ह्यातील अत्यंत दुर्मिळ घटना मानली जात आहे.

व्याघ्र गणनेसाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात ३१ मार्च रोजी शस्त्रांस्त्रासह तीन आरोपी गुप्त माहितीच्या आधारे ताब्यात घेण्यात आले. या चौकशीत शिकाऱ्यांकडून दोन बदुंका तसेच दोन दुचाकीही वनाधिकाऱ्यांनी जप्त केल्या. त्यावेळी  आरोपींचे मोबाईल तपासल्यानंतर एका आरोपीने चक्क घोरपडीसोबतच वाईट कृत्य केल्याचा रेकॉर्डेड व्हिडीओ वनाधिकाऱ्यांच्या हाती लागला आहे. ती घोरपड या घृणास्पद कृत्यानंतर जिवंत राहिली का?, आरोंपीने आणखी असं काही कृत्य केलं आहे का याबाबतची चौकशी सुरु असल्याची माहिती चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे विभागीय वनाधिकारी विशाल माळी यांनी दिली. या तिन्ही शिकाऱ्यांना मिळालेली वनकोठडी ७ एप्रिल रोजी संपत आहे. परंतु चौकशीसाठी अजूनही वाव असल्याने वनाधिकाऱ्यांची टीम हा मुद्दा न्यायालयासमोर मांडणार आहे.

वन्यप्राण्यासोबत असे कृत्य करणे ही फारच विचित्र घटना आहे. ही केस मांडताना सर्व कायदेशीर बाजू न्यायालयासमोर सादर केल्या जातील. यासाठी कायदेतज्ज्ञांची मदत घेतली जाईल.
विशाल माळी
विभागीय वनाधिकारी, चांदोली राष्ट्रीय उद्यान

शिकार केलेल्या प्राण्यांचेही रेकॉर्डिंग
शिकाऱ्यांनी शिकार केलेल्या प्राण्यांचेही मोबाईलमध्ये रॅकॉर्डिंग केले. तसेच शिकार केलेल्या ससा, पॅंगोलिन, साळिंदर, पिसुरी हरिण यांचे फोटोही त्यांच्या मोबाईलमध्ये सापडले.

सात वर्षे तुरुंगवासाची तरतूद
देशातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी त्यांना विविध वर्गवारीत संरक्षण दिले जाते. वाघ आणि सिंहाप्रमाणेच घोरपड ही वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत पहिल्या वर्गवारील संरक्षित आहे. त्यामुळे घोरपडीची शिकार किंवा अवैधरित्या तस्करी करणाऱ्याला सात वर्षे सक्त तुरुंगवासाची तरतूद या कायद्यांतर्गत आहे.

Web Title: Accused walking around with arms at Sahyadri Tiger Project raped on bengal monitor lizard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.