उंब्रज ग्रामपंचायतीच्यावतीने चौदा व्यावसायिकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:39 AM2021-04-22T04:39:35+5:302021-04-22T04:39:35+5:30
उंब्रज : उंब्रज ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उंब्रज बाजारपेठेत सोमवारी धडक कारवाई करण्यात आली. १४ व्यावसायिकांनी आरटीपीसीआर टेस्ट ...
उंब्रज : उंब्रज ग्रामपंचायतीच्यावतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उंब्रज बाजारपेठेत सोमवारी धडक कारवाई करण्यात आली. १४ व्यावसायिकांनी आरटीपीसीआर टेस्ट केली नव्हती. त्यांच्यावर कारवाई करीत प्रत्येकी एक हजाराप्रमाणे चौदा हजार दंड वसूल केला.
उंब्रज ग्रामपंचायतीचे सरपंच योगराज जाधव, उपसरपंच सुनंदा जाधव, ग्रामपंचायत सदस्य विजय जाधव, कृष्णत माळी, प्रशांत पाटील, दिगंबर भिसे, विक्रम वाघमारे, ग्रामविकास अधिकारी पी. एम. चव्हाण, मंडल अधिकारी युवराज काटे, तलाठी संदीप काळे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी एकत्रित कारवाई केली.
येथील सोमवारचा आठवडी बाजार व दररोजचा बाजार हा एका ठिकाणी यापुढे बसवला जाणार नाही. तो वेगवेगळ्या चार ठिकाणी सोशल डिस्टन्स ठेवून बसवण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. तसेच गेल्या काही दिवसांपासून उंब्रज ग्रामपंचायतीच्यावतीने फॉगिंग मशीनच्या साहाय्याने फवारणी सुरू आहे, तसेच हायड्रोक्लोराइडची फवारणीही सुरू करण्यात आल्याची माहिती सरपंच योगराज जाधव यांनी दिली.
........................................................