एका तासात चाळीस जणांवर कारवाई !

By admin | Published: July 12, 2017 03:43 PM2017-07-12T15:43:33+5:302017-07-12T15:50:06+5:30

विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर धडक मोहीम

Action for 40 people in one hour! | एका तासात चाळीस जणांवर कारवाई !

एका तासात चाळीस जणांवर कारवाई !

Next


आॅनलाईन लोकमत


सातारा, दि.१३ : केवळ चार दिवसांवर हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी होण्यास बाकी असतानाच बुधवारी सकाळी केवळ एका तासात पोलिसांनी विनाहेल्मेट दुचाकी चालविण्याऱ्या तब्बल चाळीस जणांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे वाहन चालकांनी पोलिसांचा चांगलाच धसका घेतला आहे.

महामार्गावर हेल्मेटविना दुचाकी चालविणाऱ्यांचे बळी जाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे पोलिसांनी हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ जुलैपासून शहरात हेल्मेट सक्तीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र तोपर्यंत लोकांध्ये जनजागृती आणि कायद्याचा वचक बसावा म्हणून पोलिसांनी महामार्गावर हेल्मेटविना दुचाकी चालविण्याऱ्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे.

वाढे फाटा, शिवराज पेट्रोल पंप आणि लिंबखिंड परिसरात बुधवारी सकाळी पोलिसांनी ही मोहीम राबवून केवळ एका तासात चाळीस जणांवर दंडात्मक कारवाई केली. पोलिसांना चकवा देण्यासाठी अनेकजण सेवा रस्त्याचा वापर करताना दिसत आहेत.

Web Title: Action for 40 people in one hour!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.