चार महिन्यांत ७ वाहनांवर कारवाई; १८ लाखांचा दंड : बेकायदा वाळू वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 10:17 PM2018-12-14T22:17:20+5:302018-12-14T22:19:29+5:30
मायणी परिसरात वाळू माफियाकडून वाळूची राजरोसपणे तस्करी सुरू आहे. गेल्या चार महिन्यांत एकूण सात वाहनांवर कारवाई करण्यात आली असून
मायणी : मायणी परिसरात वाळू माफियाकडून वाळूची राजरोसपणे तस्करी सुरू आहे. गेल्या चार महिन्यांत एकूण सात वाहनांवर कारवाई करण्यात आली असून, संबंधिताकडून वाळूसह १८ लाख ४१ हजारांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे.
मायणीसह निमसोड, मोराळे, गुंडेवाडी, चितळी गावांच्या परिसरातून वाहत असणाऱ्या येरळा नदी, चाँद नदी, वाघबीळ, बदाचामळा व ब्रिटिशकालीन तलाव परिसरामध्ये नैसर्गिक वाळूचे व मातीमिश्रीत वाळूचे मोठे क्षेत्र आहे. या ठिकाणावरून रात्रीच्यावेळी वाळूची तस्करी होत असते. त्यामुळे या वाळू तस्करांना अंकुश लावण्यासाठी माणयी पोलिसांनी धडक मोहिम हाती घेतल्याने वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहे.वाघबीळ हे ठिकाण मायणी येथील ब्रिटिशकालीन तलावाच्या सुरुवातीच्या भागात आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाभळीची इतर झाडे आहेत. या ठिकाणी दिवसाही जाणे अवघड आहे. अशा ठिकाणावरून वाळूमिश्रीत वाळूचा उपसा रात्रीच्यावेळी सुरू असतो. या ठिकाणी जाऊन वाळू तस्करांवर कारवाई करणे शक्य नसतानाही मायणी पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. येरळा व चाँद नदीपात्रामध्ये उसाचे क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे या ठिकाणी चोरट्या मार्गाने रात्रीचा वाळू उपसा करणाºया वाहनांवरही पोलिसांनी कारवाई केली आहे.
आठ ते दहा वाहनांवर कारवाई
गेल्या काही दिवसांपासून वाळू तस्करी करणाºया आठ ते दहा जणांवर आम्ही गुन्हे दाखल केले आहेत. तसेच त्यातील काहीजणांना शिक्षाही झाली आहे. जप्त केलेली अनेक वाहने पोलीस स्टेशन परिसरामध्ये लावण्यात आली आहेत.
- संतोष गोसावी, सहायक पोलीस निरीक्षक, मायणी पोलीस दूरक्षेत्र.