साताऱ्यात दुसऱ्या दिवशीही वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:26 AM2021-06-28T04:26:34+5:302021-06-28T04:26:34+5:30
सातारा : शहर आणि वाहतूक पोलिसांनी कोरोना महामारीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर तीव्र कारवाई सुरू केली आहे. रविवारी दिवसभरात पोलिसांनी ...
सातारा :
शहर आणि वाहतूक पोलिसांनी कोरोना महामारीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर तीव्र कारवाई सुरू केली आहे. रविवारी दिवसभरात पोलिसांनी पोवई नाक्यावर १५० जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३० हजार रुपयांचा दंड वसूल केला. शनिवारीही अशाच प्रकारे कारवाई करण्यात आली होती.
शनिवार
आणि रविवार या दोन दिवशी सातारा जिल्ह्यात कडक संचारबंदी असतानाही काही जण
विनाकारण बाहेर फिरत आहेत. त्याचबरोबर अनेक जण विनामास्क फिरत असल्याचेही
निदर्शनास येत आहे. त्यानुसार या कारवाया पोलिसांकडून करण्यात येत आहेत.
शनिवारी रात्री याच स्वरूपाच्या कारवाया करण्यात आल्या. साताऱ्यात
कोरोनाबाधितांचा संक्रमण दर कमी झाल्यानंतर अंशत: अनलॉक झाले आहे. मात्र,
शनिवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता संचारबंदी आहे. तरीही अनेकजण
विनाकारण, विनापरवाना आणि विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे रविवारी सातारा
येथे पोवई नाक्यावर सातारा शहर आणि वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांची नाकाबंदी करण्यात आली. या वेळी १५० लोकांवर प्रत्येकी दोनशे रुपयांप्रमाणे कारवाई करत
त्यांच्याकडून ३० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सहाय्यक पोलीस
निरीक्षक विठ्ठल शेलार, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, पोलीस
उपनिरीक्षक सुहास रोकडे त्याचबरोबर अन्य पोलीस कर्मचारी या कारवाईत सहभागी
झाले.