बेजबाबदार व्यावसायिकांवर धडक कारवाई...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:27 AM2021-07-10T04:27:04+5:302021-07-10T04:27:04+5:30
खंडाळा : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी गावोगावी प्रशासनाकडून पुन्हा खबरदारी घेतली जात आहे. तरीही कोरोनाचा ...
खंडाळा : ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार वाढू नये, यासाठी गावोगावी प्रशासनाकडून पुन्हा खबरदारी घेतली जात आहे. तरीही कोरोनाचा प्रसार पुन्हा हळूहळू वाढत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात कडक नियमांची अंमलबजावणी केली आहे. या पार्श्वभूमीवर बेजबाबदारपणे व्यवसाय करणाऱ्या दुकानांवर महसूल विभाग, नगर पंचायत व पोलीस प्रशासनाने धडक मोहीम राबवीत कारवाई केली.
लॉकडाऊनच्या नियमात शिथिलता दिल्यानंतर खंडाळा शहरात नागरिकांची मोठी गर्दी होऊ लागली होती. प्रशासकीय कामासाठी येणाऱ्या लोकांसह बाजारहाट यासाठी येणारी संख्याही वाढू लागली होती. त्यामुळे हॉटेल, व्यापारी दुकाने यामधून गर्दी दिसून येत होती. यातून कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता लक्षात घेऊन महसूल, नगर पंचायत व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने शहरातील चार हॉटेल सील केले तर, अन्य आठ दुकानांवर दंडात्मक कडक कारवाई केली.
खंडाळा शहरात पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या नियंत्रणाखाली भरारी पथक लोकांवर नजर ठेवून होते. ज्या हॉटेल, दुकानांमध्ये गर्दी दिसून आली तेथील छायाचित्रण करण्यात आले होते. त्यानंतर तहसीलदार दशरथ काळे, मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करीत चांगलीच चपराक दिली.
०९खंडाळा कारवाई
खंडाळा येथे प्रशासनाने दुकानांवर कारवाई करीत सील केले.