लाच मागणाऱ्या खासगी व्यक्तीवर कारवाई, संतोषवाडी येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 05:38 PM2020-05-29T17:38:21+5:302020-05-29T17:41:20+5:30
मंडळ अधिकाराच्या नावावर 10 हजाराची लाच मागणाऱ्या एक वर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. आनंदा परशुराम पाटील (वय 40, रस्ता, तांदुळवाडी मळा, आरग) याला अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हीकारवाई केली. पाटील याच्याविरूद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली : मंडळ अधिकाराच्या नावावर 10 हजाराची लाच मागणाऱ्या एक वर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. आनंदा परशुराम पाटील (वय 40, रस्ता, तांदुळवाडी मळा, आरग) याला अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हीकारवाई केली. पाटील याच्याविरूद्ध मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिरज तालुक्यातील संतोषवाडी येथे तक्रारदाराची शेतजमिन आहे. शेत जमिनीसंदर्भात एकाने तक्रार अर्ज मंडल अधिकारी यांच्याकडे आला होता. हा अर्ज निकाली काढण्यासाठी मंडल अधिकारी यांच्या हाताखाली खासगी काम करणाऱ्या आनंदा पाटील याने तक्रारदाराकडे 15 हजार रूपये लाच मागितली होती.
त्यामुळे तक्रारदाराने १३ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. पाटील याने लाच घेतली नसली तरी मागितल्याचे सिद्ध झाले आणि त्यामुळे कारवाई करण्यात आली.