वाई येथे चोरून दारू विकणाऱ्यावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:35 AM2021-04-26T04:35:55+5:302021-04-26T04:35:55+5:30
वाई : वाई तालुक्यामध्ये लॉकडाऊनचे कडक निर्बंध असताना वाई तालुक्यात गैरकानुनी कामे चालू आहेत. त्यातूनच रविवारी वाई पोलिसांनी कारवाई ...
वाई : वाई तालुक्यामध्ये लॉकडाऊनचे कडक निर्बंध असताना वाई तालुक्यात गैरकानुनी कामे चालू आहेत. त्यातूनच रविवारी वाई पोलिसांनी कारवाई केली आहे.
वाई पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या डी. बी. विभागाच्या पथकाने गणेश फरांदे रा. यंग (रविवार पेठ वाई) हा त्याच्या राहत्या घराचे शेजारी मोकळ्या जागेत विदेशी दारूची चोरटी विक्री करीत असल्याची माहिती खोबरे यांना मिळताच त्यांनी या ठिकाणी सापळा रचून छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकाने नियोजित स्थळी तातडीने धाव घेऊन सापळा लावून छापा टाकला असता त्याच्या ताब्यात असणारे दारूचे बॉक्स उघडून पहिले असता त्यात दारूच्या देशी-विदेशी बाटल्या आढळून आल्या. यावेळी पथकाने त्याच्या ताब्यातील १ लाख ६ हजार १७८ रुपयांच्या देशी-विदेशी दारूंच्या बाटल्या जप्त करून गणेश फरांदे यास ताब्यात घेऊन त्याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.