फलटणमध्ये नियम मोडणाऱ्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:35 AM2021-04-14T04:35:52+5:302021-04-14T04:35:52+5:30
फलटण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी फलटण शहर पोलिसांनी फलटण शहरात धडक कारवाई करून नियम मोडणाऱ्यांकडून २४ हजार ...
फलटण : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी फलटण शहर पोलिसांनी फलटण शहरात धडक कारवाई करून नियम मोडणाऱ्यांकडून २४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला तसेच ३ दुकाने सीलही करण्यात आली आहेत.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनमधून मिळालेली माहितीनुसार कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने काही निर्बंध घातले आहेत. असे असतानाही सोमवारी फलटणमध्ये विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर ४७ केसेस करण्यात आल्या तर त्यांना ९ हजार ४०० रुपये दंड आकारण्यात आला. तसेच फलटण शहरात दुकानांमध्ये सोशल डिस्टंसिंग न ठेवल्याने ९ दुकानांवर केसेस करून १५ हजार रुपये दंड आकारण्यात आला.
सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला म्हणून असिफ मोहिउद्दिन कोतवाल, अखिल युनूस कोतवाल, जुनेद रफिक बागवान यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हे दाखल करून दुकाने सील करण्यात आली आहेत, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी दिली आहे.