कराड पालिकेच्या वतीने थकबाकीदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:39 AM2021-03-16T04:39:03+5:302021-03-16T04:39:03+5:30
येथील नगरपालिकेच्या वतीने थकबाकीदार असणाऱ्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे. रविवार पेठेतील एक कापड दुकान व सह्याद्री पतसंस्थेच्या ...
येथील नगरपालिकेच्या वतीने थकबाकीदार असणाऱ्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे. रविवार पेठेतील एक कापड दुकान व सह्याद्री पतसंस्थेच्या रविवार, गुरुवार व शनिवार पेठ अशा तीन मिळकती; शनिवार पेठ गणपती मंदिर येथील जीटीएल मोबाइल टॉवर अशा एकूण पाच ठिकाणी जप्तीची कारवाई करण्यात आली. कारवाईत रविवार पेठेतील कापड दुकानदाराने थकीत 79,088 रुपये ताबडतोब नगर परिषदेत भरले.
सदरची कारवाई मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या मार्गदर्शनाखाली, करवसुली प्रमुख उमेश महादर, लिपिक जयवंत यादव, सुरेश जाधव, अय्याज आत्तार, जितेंद्र मुळे, फिरोज मुजावर, सादिक मुल्ला, पांडुरंग सपकाळ, राजेंद्र ढेरे, सुनील बसरगी, इखलास शेख, फय्याज शेख व सर्व कर्मचारी यांनी केली.
नगर परिषदेने 22 फेब्रुवारीपासून वसुली मोहीम सुरू केली आहे, आजअखेर 107 नळ कनेक्शन तोडली आहेत. तर 5 मिळकतींवर जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच आजअखेर 3,01,25,520 इतकी घरपट्टी व पाणीपट्टीची रक्कम वसूल करण्यात आली आहे.
अद्यापही ज्यांनी कराची रक्कम भरलेली नाही, त्यांनी कराची रक्कम नगर परिषदेत भरून सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.