बोगस माहिती भरणाऱ्यांवर कारवाई-सातारा शिक्षक आक्रमक : जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 11:21 PM2018-06-05T23:21:05+5:302018-06-05T23:21:05+5:30

Action on bogus informants- Satara teacher aggressive: Representation to the chief executive officer of Zilla Parishad | बोगस माहिती भरणाऱ्यांवर कारवाई-सातारा शिक्षक आक्रमक : जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

बोगस माहिती भरणाऱ्यांवर कारवाई-सातारा शिक्षक आक्रमक : जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

Next

सातारा : सातारा जिल्ह्यातील काही शिक्षकांनी स्वत:ला संवर्ग १मध्ये आणण्यासाठी शासनाकडे
बोगस माहिती भरली असल्याचा आरोप शिक्षकांनी केला. यावर संबंधित शिक्षकांची माहिती मिळाल्यास त्यांच्यावर कडककारवाई करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी शिक्षकांना दिले.

मे महिन्यापासून सुरू असलेला बदलीचा घोळ मिटता मिटत नसल्याचे चित्र समोर आले आहे. या बदलीबाबत जिल्हा परिषदेने शिक्षकांना वाºयावर न सोडता मातृसंस्था म्हणून शिक्षकांची प्रश्न समजून घेऊन त्यातून मार्ग काढण्याच्या उद्देशाने शिक्षकांचे शिष्टमंडळ संजीवराजे व डॉ. शिंदे यांना भेटले, यावेळी त्यांना निवेदनही देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे, जिल्हांतर्गत बदली २०१८ मध्ये अनेक शिक्षकांनी स्वत:ची बोगस माहिती भरून या बदल्यात लाभ घेतला आहे. अनेकांनी बोगस अपंगत्व, आजारपण दोघांमधील खोटे अंतर, दुर्गममधील कमी वर्षे काम करणे, दुर्गममध्ये काम न करता काम केल्याची चुकीची माहिती देणे, जोडीदार नोकरीत नसताना नोकरीत असल्याचे दाखवून बोगस दाखला जोडणे गेल्यावर्षी आंतरजिल्हा बदली होऊनही यंदा फॉर्म भरण्यास परवानगी नसतानाही फॉर्म भरून आलेल्या शिक्षकांनी चौकशी करणे, अशा अनेक प्रकारे खोटी माहिती देऊन जिल्हांतर्गत बदली लाभ उठविला आहे. त्यामुळे शिक्षक विस्थापित झाले आहेत. खोटी माहिती भरणाºया शिक्षकांची व अपंग प्रमाणपत्र जोडणाºया शिक्षकांच्या आजारपणाची तपासणी करून विस्थापित शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा.
दरम्यान, जिल्हा परिषद शिक्षकांना सदैव पाठीशी राहून त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्यासोबत राहील, असे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिले.

...तर तपासणीची फी संघटना देईल
जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र बदली प्रक्रियेसाठी वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अपंग शिक्षकांची संख्या ४ हजार ५०० पर्यंत पोहोचली आहे. संगमनगर शाळेवर संवर्ग १ मधील सर्व १५ शिक्षकांना नेमणूका मिळाल्या आहेत. या सर्व बाबी लक्षात घेता जिल्हा परिषदेने खासगी दवाखान्यातून या शिक्षकांची वैद्यकीय तपासणी करावी, याचा सर्व खर्च संघटना करेल, असे आश्वस्त केले. खासगी दावाखान्यातून सर्वच शिक्षकांची तपासणी केली तर ‘दूध का दूध’ होईल, असे आग्रही मत संघटनेच्या पदाधिकारी व शिक्षकांनी मांडले.

‘लोकमत’चे आभार
शिक्षक बदली प्रक्रियेचा घोळ सुरू झाल्यानंतर शिक्षकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र ‘लोकमत’ने याबाबत सातत्याने पाठपुरावा करून शिक्षकांच्या व्यथा शासन दरबारी मांडल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात शिक्षक संघटनेने बैठक आयोजित करून ‘लोकमत’चे आभार मानले.

Web Title: Action on bogus informants- Satara teacher aggressive: Representation to the chief executive officer of Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.