दोघांवर कारवाई; दारूसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:39 AM2021-04-18T04:39:31+5:302021-04-18T04:39:31+5:30
फलटण : सरडे, ता. फलटण येथे अवैध देशी दारूची विक्री करणाऱ्या दोन जणांवर फलटण ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. संबंधितांकडून ...
फलटण : सरडे, ता. फलटण येथे अवैध देशी दारूची विक्री करणाऱ्या दोन जणांवर फलटण ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. संबंधितांकडून २० हजार ५०० रुपयांची गावठी हातभट्टीची दारू व एक दुचाकी जप्त करण्यात आली.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सरडे गावच्या हद्दीत सरडे ते राजाळे रस्त्यावर खुदाबक्ष नावाच्या दुकानात देशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याठिकाणी कारवाई करून पोलिसांनी मारुती बाबा जाधव (वय ४२) व सुमित सखाराम कांबळे (वय २१, दोघे रा. घाडगेवाडी, ता. बारामती) यांना ताब्यात घेतले. संबंधितांकडून २० हजार ५०० रुपयांची गावठी दारू व एक दुचाकी जप्त करण्यात आली. फलटण ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहे.