देशमुखनगर येथे देशी दारू दुकानावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:02 AM2021-05-05T05:02:37+5:302021-05-05T05:02:37+5:30
सातारा: कोरोना महामारीत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असतानाही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा तालुक्यातील देशमुखनगर येथील देशी दारू दुकानचालकावर ...
सातारा: कोरोना महामारीत आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असतानाही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा तालुक्यातील देशमुखनगर येथील देशी दारू दुकानचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. श्रीकांत देेशमुख असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव असून त्याला प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील देशमुखनगर गावच्या हद्दीत देशी दारूचे दुकान असून कोरोना महामारीत लॉकडाऊन असतानाही रविवार, दि. २ मे रोजी श्रीकांत लालासाहेब देशमुख (वय २१, रा. नांदगाव, ता. सातारा) याने सुरू ठेवले होते. यावेळी देशी दारू दुकानामध्ये काम करणारा मुलगा हा गिऱ्हाईकांना देशी दारूच्या बाटल्या विक्री करत असल्याचे बोरगाव पोलिसांच्या निदर्शनास आले. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात श्रीकांत देशमुख याच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्याला प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबतचा गुन्हा बोरगाव पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल सारिका खोचरे यांनी दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देसाई करत आहेत.