अवैध व्यवसायांवर कारवाई ; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:31 AM2021-01-10T04:31:13+5:302021-01-10T04:31:13+5:30

कोरेगाव : परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी अवैध व्यवसायांवरील कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. शुक्रवारी दिवसभरात तीन ठिकाणी ...

Action on illegal businesses; Eight lakh items confiscated | अवैध व्यवसायांवर कारवाई ; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध व्यवसायांवर कारवाई ; आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next

कोरेगाव : परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी अवैध व्यवसायांवरील कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. शुक्रवारी दिवसभरात तीन ठिकाणी कारवाई करत तब्बल आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे नोंद केले गेले आहेत. पोलिसांच्या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, जुना मोटार स्टँडनजीक एका व्हिडीओ सेंटरमध्ये ऑनलाईन जुगार खेळला जात असल्याचे आढळून आले. या सेंटरच्या चालकासह खेळाडूंवर कारवाई करण्यात आली. तेथील २ लाख ८४ हजार ६० रुपयांचे सर्व साहित्य जप्त केले. त्यापाठोपाठ आझाद चौकातील व्हिडीओ सेंटरमध्ये ऑनलाईन जुगार खेळला जात असतानाच कारवाई करण्यात आली. तेथील ४ लाख १९ हजार ७३० रुपयांचे सर्व साहित्य जप्त करण्यात आले. सायंकाळच्या सुमारास जुना मोटार स्टँडनजिक महादेवनगर येथे

बेकायदेशीररित्या दारुची वाहतूक रोखण्यात आली. जीपसह

देशी-विदेशी दारुचे बॉक्स असे मिळून ८३ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

करण्यात आला.

याप्रकरणी सुमित कदम, दीपक मोरे, आदित्य ओसवाल, सचिन

जाधव, रवींद्र नामदास, संजय सावंत, चंद्रकांत जाधव, राजेंद्र जाधव, संजय

खरात, अरुण जाधव यांच्याविरोधात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक

दत्तात्रय नाळे, हवालदार सुधीर खुडे, प्रमोद चव्हाण, महादेव खुडे, नाईक

मिलिंद कुंभार, अमोल सपकाळ यांच्या पथकाने या कारवाया केल्या.

Web Title: Action on illegal businesses; Eight lakh items confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.