कलेढोण येथे अवैद्य वाळूवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 03:25 PM2021-04-28T15:25:15+5:302021-04-28T15:27:30+5:30

sand Crimenews Satara : खटाव तालुक्यातील कलेढोण येथील विटा-कलेढोण मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर मायणी पोलिसांनी कारवाई करून ७ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दोघांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी दिली.

Action on illegal sand at Kaledhon | कलेढोण येथे अवैद्य वाळूवर कारवाई

कलेढोण येथे अवैद्य वाळूवर कारवाई

googlenewsNext
ठळक मुद्देकलेढोण येथे अवैद्य वाळूवर कारवाई दोघांना अटक : सात लाखांचा मुद्देमाल जप्त

मायणी : खटाव तालुक्यातील कलेढोण येथील विटा-कलेढोण मार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर मायणी पोलिसांनी कारवाई करून ७ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दोघांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी यांनी दिली.

याबाबत माहिती अशी की, विटा-कलेढोण मार्गावर कलेढोण हद्दीतून डंपरमधून अवैद्य वाळू वाहतूक रात्रीच्यावेळी सुरू असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून पोलिसांना मिळाली. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, पोलीस कॉन्स्टेबल बाबुराव खांडेकर, नवनाथ शिरकुळे, प्रकाश कोळी, होमगार्ड रोहित घाडगे यांनी कलेढोण गावातील श्री खंडोबा मंदिराच्या तेथे सापळा लावला. त्यावेळी विटा-कलेढोण मार्गावरून माहिती मिळालेले वाहन (एमएच १२ सीटी ९७९४) येताना दिसले.

संबंधित वाहन थांबविल्यानंतर वाहनाबाबत चौकशी केली असता यामध्ये विनापरवाना वाळू वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर डंपर चालक सचिन मधुकर माने (वय २३, रा. घाणंद ता. आटपाडी जि. सांगली) व अमोल रामचंद्र जुगदर (वय ३२, रा. जांभुळणी ता. आटपाडी) या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून डंपर किंमत ७ लाख व डंपर मधील अवैध वाळू ३ ब्रास २१ हजार रुपये असा एकूण ७ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेची नोंद मायणी पोलीस दूरक्षेत्रात झाली असून पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी तपास करत आहेत.

Web Title: Action on illegal sand at Kaledhon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.