कºहाडात पन्नासहून अधिक वाहनांवर कारवाई
By admin | Published: May 22, 2014 12:06 AM2014-05-22T00:06:41+5:302014-05-22T00:20:49+5:30
वाहतूक शाखेची वाहन तपासणी मोहीम
कºहाड : कºहाड शहर वाहतूक शाखेच्या वतीने बुधवारपासून सुरू करण्यात आलेल्या वाहन तपासणी मोहिमेत पहिल्या दिवशी ५0 हून अधिक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक विद्या जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. बुधवारपासून पुढे दहा दिवस वाहन तपासणी मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे. वाहनांच्या चोरीचे प्रकार वाढले असून, बनावट नंबर प्लेटचा वापर करून दुचाकी चोर्यांचे अनेक प्रकार शहर व परिसरात घडले आहेत. त्यामुळे खराब व फॅन्सी नंबर प्लेट, आरसी बुक तपासणी, लाईट, फिल्म कोटिंग याबाबत वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. दि. २३ व २४ रोजी दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे. दि. २५ व २६ रोजी तीनचाकी आॅटो रिक्षांची कागदपत्रे तपासण्यात येतील. दि. २७ व २८ रोजी दिव्याबाबत तर दि. २९ व ३० रोजी चारचाकी वाहनांना असणार्या फिल्म कोटिंगबाबत कारवाई केली जाईल. कºहाड शहर, मलकापूर, कृष्णा कॅनॉल, विद्यानगर परिसरात बुधवारी कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)