साताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्या १० दुचाकीस्वारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:42 AM2021-05-20T04:42:32+5:302021-05-20T04:42:32+5:30
सातारा : कोरोना महामारीत विनाकारण दुचाकी फिरवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर, शाहूपुरी, सातारा तालुका पोलिसांनी १० दुचाकीस्वारांवर ...
सातारा : कोरोना महामारीत विनाकारण दुचाकी फिरवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सातारा शहर, शाहूपुरी, सातारा तालुका पोलिसांनी १० दुचाकीस्वारांवर कारवाई केली आहे.
कोविडचा संसर्ग वाढू नये म्हणून सातारा जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. असे असतानाही बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात दुचाकी चालवून आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गोविंद शेखर झडगे (वय २१, रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार, सातारा), बाळकृष्ण गुलाब साळुंखे (४५, रा. कुशी, ता. सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार पोलीस हवालदार सतीश साबळे यांनी दिली असून, अधिक तपास पोलीस हवालदार पी. एल. भिसे करीत आहेत.
पोवई नाका परिसरात विनाकारण दुचाकी फिरविणाऱ्या लक्ष्मण भिकू जाधव (२९, रा. कामाठीपुरा मठाजवळ, ता. सातारा), शेखर गुलाबराव मोरे (३८, रा. १९९, पाण्याच्या टाकीजवळ, गोडोली, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार पोलीस हवालदार संतोष इष्टे यांनी दिली असून, अधिक तपास पोलीस नाईक आर. व्ही. घाडगे करीत आहेत.
पोवई नाका परिसरात विनाकारण दुचाकी फिरवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी किरण दत्तात्रय गोडसे (३०, रा. जनाई मळाई मंदिर, खिंडवाडी, ता. सातारा), उमेश शांताप्पा कैनूर (३९, रा. लक्ष्मी मंदिराजवळ, लक्ष्मी टेकडी, सातारा), सुजाता धनंजय देगांवकर (४०, रा. कुंभारवाडा, केसरकर पेठ, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार पोलीस नाईक सचिन पोळ यांनी दिली असून, अधिक तपास पोलीस हवालदार कारळे करीत आहेत.
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात विनाकारण दुचाकी फिरविणाऱ्या अमृत अर्जुन कुंभार (३१, रा. आदित्यनगर, सातारा), साहिल इन्नुस आत्तार (२६, रा. शेंद्रे, ता. सातारा), सागर बाबासोा फरांदे (२७) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची तक्रार पोलीस नाईक अब्दुल खलिफा यांनी दिली असून अधिक तपास पोलीस नाईक आर. व्ही. घाडगे करीत आहेत.
चौकट : तरुण मुले पडताहेत घराबाहेर
शहरामध्ये विनाकारण फिरू नका, असे पोलीस वारंवार लोकांना सांगत आहेत; मात्र तरीसुद्धा अनेकजण पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत आहेत. विशेषत: तरुण मुले काहीही काम नसताना घराबाहेर पडत आहेत. अशा मुलांवर नाइलाजास्तव कारवाई करावी लागत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.